मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात, हायकोर्टाने याचिका फेटाळली

अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात, हायकोर्टाने याचिका फेटाळली

ईडीने वारंवार समन्स बजावले असून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण, अनिल देशमुख चौकशीला हजर राहिले नाही.

ईडीने वारंवार समन्स बजावले असून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण, अनिल देशमुख चौकशीला हजर राहिले नाही.

ईडीने वारंवार समन्स बजावले असून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण, अनिल देशमुख चौकशीला हजर राहिले नाही.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 29 ऑक्टोबर : 100 कोटी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh)  यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ED ईडीने बजावलेली समन्स रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) रद्द केली आहे. त्यामुळे देशमुखांवर कारवाईची शक्यता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख हे बेपत्ता आहे. त्यांच्याविरोधात ईडीने वारंवार समन्स बजावले असून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण, अनिल देशमुख चौकशीला हजर राहिले नाही. त्यातच त्यांनी ED कडून दाखल करण्यात आलेल्या मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money Laundering) सुरक्षेची मागणी केली. काही दिवसांपूर्वी ईडीच्या कारवाईपासून संरक्षण (plea seeking protection) मिळावे, यासाठी अनिल देशमुख यांनी कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. आपल्याविरोधात कोणत्याही प्रकारची सक्तीची कारवाई केली जाऊ नये. त्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी अर्ज केला होता.

टॉयलेट सीटपेक्षाही खराब आहे तुमची Smartphone Screen, गंभीर आजारांचा धोका

पण हायकोर्टाने समन्स रद्द करता येणार नाही, असं स्पष्ट करत देशमुख यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याआधीही देशमुख यांनी कोर्टातही याचिका दाखल केली होती. ही याचिकाही फेटाळून लावण्यात आली होती.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर मुंबईतील अनेक हॉटेल बार मालकांकडून वसुली केल्याचा आरोप आहे. यासोबतच निलंबित मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझेनं देशमुखांच्या सूचनेनुसार 4.7 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. वसूल केलेले पैसे नागपुरातील त्यांच्या मुलाच्या शिक्षण ट्रस्टजवळ पोहोचले, असं म्हटलं जात आहे. या प्रकरणी ईडीने कारवाईही केली आहे. पण, देशमुख हे गेल्या कित्येक दिवसांपासून चौकशीला हजर राहिले नाही. त्यामुळे देशमुख आता चौकशीला हजर राहता की पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल करता हे पाहण्याचे ठरणार आहे.

तुमच्या गाडीचा FASTAG जुना तर झाला नाही? पडू शकतो मोठा भुर्दंड

दरम्यान,  अनिल देशमुखची याचिका रद्द झाली. मग ठाकरे सरकार त्यांना अटक का करत नाही? मी ईडीला विनंती करणार की अनिल देशमुख यांच्याविरोधात वॉरंट काढून त्यांना फरार घोषीत करावे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केली आहे.

तसंच, 'अनिल देशमुख यांना अटक होणारचं मग एनसीपीच्या कार्यकर्त्यांना मन्नत प्रमाणे आर्थर रोड जेल बाहेर ही जल्लोष करायला यावे लागेल. तीन मंत्रालयाचे पुरावे माझ्याकडे आले आहे. आता तर अजून एक असे चार मंत्रालयाचे पुरावे आले आहे. त्यात ते( नवाब मलिक) असू शकतात, असा दावाही सोमय्यांनी केला आहे.

First published: