S M L

चीनचे स्पेस स्टेशन सोमवारी मुंबईवर कोसळणार ?

या चिनी स्पेस स्टेशनचं नाव टीयाँगाँग असं आहे. स्कूल बसच्या आकाराचं हे स्पेस स्टेशन असल्याची माहिती समोर आली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 1, 2018 01:54 PM IST

चीनचे स्पेस स्टेशन सोमवारी मुंबईवर कोसळणार ?

01 एप्रिल : 2016मध्ये अंतराळात चीनचं भरकटलेलं स्पेस स्टेशन सोमवारी मुंबईवर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्टेशनच्या मार्गात महाराष्ट्रासह मुंबईचा बराचसा भाग येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. या चिनी स्पेस स्टेशनचं नाव टीयाँगाँग असं आहे. स्कूल बसच्या आकाराचं हे स्पेस स्टेशन असल्याची माहिती समोर आली आहे.

परंतु अंतराळातून पृथ्वीवर येताना त्याचे तुकडे होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तुकड्यांमध्ये विषारी वायू असल्यानं पृथ्वीवर कोसळल्यानंतर त्याला हात न लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या स्पेस स्टेशनच्या मार्गात महाराष्ट्रासह मुंबई, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर आहे. परंतु स्पेस स्टेशन अतितीव्र वेगानं येत असल्यानं कुठे पडेल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे.

सोमवारी पहाटे चार वाजून 55 मिनिटांनी या स्पेस स्टेशननं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर कुठे कोसळेल, याबाबत अंदाज व्यक्त करता येईल. त्या प्रमाणे या स्पेस स्टेशनचे तुकडे 200 ते 300 किलोमीटर परिसरात पसरण्याची शक्यताही वर्तवली जातेय. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2018 01:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close