मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मराठी असल्याने रेल्वेतील महिला कर्मचाऱ्याचा शारीरिक छळ, आरोपी अधिकाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मराठी असल्याने रेल्वेतील महिला कर्मचाऱ्याचा शारीरिक छळ, आरोपी अधिकाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

mumbai woman molestation for 8 years याबाबत तक्रार करूनही काही झालं नाही, उलट तिचीच बदली झाल्याने नोकरीच्या भीतीपोटी ती सर्व सहन करत राहिली. जवळपास 8 वर्षे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं ती सांगते. मराठी असल्याच्या रागातून हा छळ केला जात होता असंही म्हटलं जात आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 14 मे : पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) सिग्नल विभागात काम करणाऱ्या 35 वर्षीय महिलेचा शारीरिक छळ (Molestation of woman working in Railway) झाल्याचं समोर आलं आहे. आठ वर्षांपासून हा छळ सुरू होता. पण अनेकदा तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. उलट महिलेचीच बदली (Transfer) करण्यात आली. पण बदलीनंतरही तिचा छळ सुरू होता. या प्रकरणी अखेर महिलेनं रेल्वे पोलिसांत (Railway Police) तक्रार दिली. रेल्वे पोलिसांवरही दबाव निर्माण करण्यात आला पण त्याला बळी न पडता पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली.

वसई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता (नाव बदललेले) या पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड येथील सिग्नल विभागात कंट्रोल टॉवरवर काम करतात. यादरम्यान नम्रता यांचे वरिष्ठ अधिकारी राजीव कुमार मंडळ यांनी तिच्याबरोबर गैरवर्तन केलं.  नम्रतावर बळजबरी करण्याचा त्यानं प्रयत्न केला. पण तिनं त्याच्या तावडीतून कशीबशी सुटली. त्यांनंतर राजीव कुमार नावाच्या अधिकाऱ्यांनीही तिच्याशी गैरवर्तन केलं. तिथूनही पळून जात ती मीरा रोड रेल्वे स्टेशनवर जाऊन बसली. राजीव यांनी आधीही तिला व्हाट्सअपवर अश्लिल चॅट करत त्रास दिला होता.

(वाचा-बायकोनं आत्महत्या केल्याचं समजताच नवऱ्यानं ऑफिसातच उचललं टोकाचं पाऊल)

नम्रता सिग्नल दुरुस्तीसाठी जाताना तो तिच्याबाबत अश्लिल गोष्टी बोलायचा. अत्यंत वाईट भाषेत तिच्याशी बोलायचे. तिच्यावर घाणेरड्या कमेंट हे दोघं करत होते. हा सर्व छळ सुरू असतानाच तिला कुणाला याबाबत सांगितल्यास नोकरी गमवावी लागेल अशी धमकी द्यायचे. याबाबत तक्रार करूनही काही झालं नाही, असं नम्रता सांगते. उलट तिचीच बदली झाल्याने नोकरीच्या भीतीपोटी ती सर्व सहन करत राहिली. जवळपास 8 वर्षे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं ती सांगते. मराठी असल्याच्या रागातून हा छळ केला जात होता असंही म्हटलं जात आहे.

अखेर एक दिवस दररोजच्या छळाला कंटाळून नम्रताने राजीव कुमार याच्या विरोधात वसई लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सहाय्यक निरीक्षक विरनाथ माने यांनी कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांना गुन्हा दाखल करू नये म्हणून अनेक फोन आले. पण कुणालाही न जुमानता कारवाई करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी राजीव कुमार याला इथं अटक केली.

(वाचा-'आधी संपत्ती मगच किडनी'; घरातील वाद कोविड वॉर्डापर्यंत, पती-पत्नीमध्ये राडा)

काही दिवसांपूर्वी घडलेल्या दीपाली चव्हाण या वनविभागातील महिलेच्या आत्महत्या प्रकरणातही वरिष्ठांच्या छळामुळंच चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. या सर्व छळामुळे नम्रताच्या मनात आत्महत्येचा विचारही डोकावला होता. पण लहान मुलीचा विचार करून तिनं धीर एकवटला आणि तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली. या प्रकरणी निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विरनाथ माने तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Mumbai, Railway