मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Shocking! मुंबईच्या हॉटेलमध्ये खासदार सापडले मृतावस्थेत

Shocking! मुंबईच्या हॉटेलमध्ये खासदार सापडले मृतावस्थेत

MP Mohan Delkar : सात वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेलेल्या नेत्याचा असा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

  मुंबई, 22 फेब्रुवारी: मुंबईच्या हॉटेलमध्ये खासदार मृतावस्थेत सापडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दमण आणि दीवचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मरीन ड्राइव्हच्या एका हॉलेलमध्ये मिळाला. पोलिसांनी आत्महत्येची शक्यता व्यक्त केली आहे. खासदार डेलकर यांच्याजवळ गुजरातीत लिहिलेली एक चिठ्ठी आढळल्याचं समजतं.

  मुंबई पोलिसांचा घटनास्थळी तपास सुरू आहे. त्यांनी कुठल्याही कारणाला अद्याप पुष्टी दिलेली नाही. पण खासदाराच्या अशा मृत्यूने शहरातच नव्हे तर देशात खळबळ उडाली आहे.

  कोण आहेत मोहन डेलकर?

  मोहन डालकर दादरा -नगरहवेली मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार होते. 58 वर्षांचे डेलकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. 1989 पासून ते या लोकसभा मतदार संघातून निवडून येत आहेत.

  1989 मध्ये पहिल्यांदा ते निवडून आले आणि खासदार झाले. त्यानंतर भारतीय नवशक्ती पार्टीकडून ते निवडणूक लढले. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पण त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. 2019 ची निवडणूक ते अपक्ष म्हणूनच लढले होते आणि जिंकले होते. सात वेळा खासदार म्हणून निवडून गेलेल्या लोकसभा सदस्याचा असा संशयास्पद रीत्या म-मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

  First published:

  Tags: Breaking News, Crime, Maharashtra News, Mumbai, Mumbai police, Suicide