सरसंघचालक मोहन भागवत आज पालघरमध्ये, विराट हिंदू संमेलनाचं आयोजन

सरसंघचालक मोहन भागवत आज पालघरमध्ये, विराट हिंदू संमेलनाचं आयोजन

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आज विश्व हिंदू परिषदेच्या तलासरी प्रकल्प सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता दिनाच्या निमित्ताने विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : सरसंघचालक मोहन भागवत आज पालघरमध्ये आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आज  विश्व हिंदू परिषदेच्या तलासरी प्रकल्प सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता दिनाच्या निमित्ताने विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या जनजाती विद्यार्थी वसतिगृह प्रकल्पाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं या हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आहेत.

विहिंप  आणि  RSS चे अनेक वरिष्ठ नेते आणि मार्गदर्शक यावेळी उपस्थित असतील. या संमेलनाला पालघर जिल्ह्यासह नाशिक, मुंबई, ठाणे या जिल्ह्यातून आणि शेजारच्या गुजरात राज्यातुनही हजारोंच्या संख्येने लोक येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2018 11:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading