मुंबई, 16 ऑक्टोबर : फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर मोदी सरकार कडक कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात दाऊदच्या संपत्तीचा सर्वात मोठा लिलाव नोव्हेंबरमध्ये होणार आहे. हा लिलावर स्मगलर्स अॅंण्ड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स अॅक्ट (SAFEMA) अंतर्गत होईल. यानुसार 10 नोव्हेंबर रोजी दाऊदच्या 7 संपतीचा लिलाव करण्यात येईल. कोरोनामुळे हा लिलाव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.
ही दाऊदच्या संपत्तीची आतापर्यंतचा सर्वात मोठा लिलाव असणार आहे. एकाच वेळी त्याच्या 7 संपत्तीचा लिलाव करण्यात येईल. यातील 6 प्रॉपर्टी रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबाके गावातील आहे. याआधीदेखील दाऊदच्या राज्यातील मुंबई व अनेक भागातील संपत्तीचा लिलाव करण्यात आला आहे.
हे ही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जारी केलं 75 रुपयांचं नाणं, इथे पाहा First Look
या संपत्तीचा होणार लिलाव
27 गुंठा जमिन-रिजर्व किंमत 2,05,800 रुपये
29.30 गुंठा जमिन-रिजर्व किंमत 2,23,300 रुपये
24.90 गुंठा जमिन-रिजर्व किंमत 1,89,800 रुपये
20 गुंठा जमिन- रिजर्व किंमत 1,52,500 रुपये
18 गुंठा जमिन-रिजर्व किंमत 1,38,000 रुपये
30 गुंठा जमिनीसोबत घर- रिजर्व कीमत 6,14,8100 रुपये
2018मध्येही झाला होता लिलाव
यापूर्वी 2018 मध्ये दाऊद इब्राहिमची मुंबईस्थित संपत्तीचा 3.51 कोटींमध्ये लिलाव झाला होता. या लिलावात खूप जणं सहभागी झाले होते. सर्वात जास्त बोली सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीएटी) ने लावली आणि दाऊदच्या संपत्तीचे मालक झाले. तेव्हा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीट स्थित दाऊद आणि त्यांच्या कुटुंबाच्या 3 संपत्तीपैकी एकाचा लिलाव करण्यासाठी निविदा मागवली होती आणि बोली लावण्याचा आयोजन केलं होतं. नुकतेच पाकिस्तानने एफएटीएफच्या ग्रे सूचीमधून बाहेर पडण्यासाठी शेवटी 88 प्रतिबंधित दहशतवादी संघटना और हाफिज सईद, मसूद अजहर व दाऊद इब्राहिमसारख्या समुहावर आर्थिक प्रतिबंध लावले आहेत. सोबतच त्यांची सर्व संपत्ती जप्त करणे आणि बँक खाते फ्रीज करण्याचा आदेश दिला आहे. आतापर्यंत डॉन दाऊद देशात नसल्याचे सांगणाऱ्या पाकिस्तानने पहिल्यांदाच तो देशात असल्याचे मान्य केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dawood ibrahim