मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मोदी सरकारच्या योजनेच्या नावाखाली महिलांना गंडा; मुंबईत 211 जणींना लुबाडलं

मोदी सरकारच्या योजनेच्या नावाखाली महिलांना गंडा; मुंबईत 211 जणींना लुबाडलं

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुद्रा कर्ज योजनेच्या नावाखाली दोनशेहून अधिक महिलांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुद्रा कर्ज योजनेच्या नावाखाली दोनशेहून अधिक महिलांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

Crime in Mumbai: मोदी सरकारच्या (Modi Government) महत्त्वाकांक्षी मुद्रा कर्ज योजनेच्या (Mudra Loan Scheme)नावाखाली दोनशेहून अधिक महिलांना गंडा (Fraud In Mumbai) घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk
वसई, 18 ऑगस्ट: मोदी सरकारच्या (Modi Government) महत्त्वाकांक्षी मुद्रा कर्ज योजनेच्या (Mudra Loan Scheme)नावाखाली दोनशेहून अधिक महिलांना गंडा (Fraud In Mumbai) घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी दोन महिलांनी कळंब गावात जाऊन येथील 211 महिलांना कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्यांना लाखोंचा गंडा घातला आहे. आरोपी महिलांना कर्ज मिळवून देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावाखाली फिर्यादी महिलांकडून प्रत्येक 3 हजार रुपये लाटले आहेत. पण त्यानंतर गावातील कोणालाच कर्ज मिळालं नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित महिलांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्वयंजिता गोरक्ष आणि राधिका ऊर्फ तेजल राठोड असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी महिलांची  नावं आहेत. अर्नाळा पोलीस सध्या भामट्या महिलांचा शोध घेत आहेत. आरोपी महिलांना महिलांची फसवणूक करण्यासाठी केंद्र सरकारची मुद्रा कर्ज योजनेचा पद्धतशीर वापर केला आहे. महिलांना व्यावसायासाठी आर्थिक हातभार लावण्यासाठी केंद्र सरकारनं ही योजना सुरू केली होती. हेही वाचा-Olx वर कारचे फोटो दाखवले अन् डॉक्टराला 4 लाखांना लुबाडले, बारामतीतीत घटना याचाच फायदा घेत आरोपी महिलांनी अर्नाळा परिसरातील कळंब गावात जाऊन गावातील महिलांना मुद्रा कर्ज योजनेबाबत माहिती दिली. त्यानंतर मुद्रा कर्ज योजनेतून कर्ज मंजूर करून देतो, असं सांगत गावातील 211 महिलांना गंडा घातला आहे. आरोपी महिलांनी गवातील महिलांच्या विविध कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति आणि कर्म मिळवून देण्यासाठी प्रक्रिया फी म्हणून प्रती महिला 3 हजार रुपयाप्रमाणे 6 लाख 33 हजार रुपये घेतले आहेत. हेही वाचा-9वी पास तरुणी निघाली सेक्सटॉर्शनची मास्टरमाइंड; श्रीमंत मुलांना FBवर हेरायची अन् याप्रकरणी फसवणूक झालेल्या माहिलांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात संबंधित दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, आम्ही फिर्यादी महिलांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. लवकरच आरोपी महिलांना अटक केली जाईल.
First published:

Tags: Crime news, Mumbai

पुढील बातम्या