News18 Lokmat

मोदींनी लोकांना दिवास्वप्नं दाखवली- पृथ्वीराज चव्हाण

निवडणुका जिंकण्यासाठी मोदी-फडणवीसांनी पोकळ आश्वासनं दिली अशी टीकाही त्यांनी केली. IBNलोकमतच्या न्यूजरूम चर्चेत पृथ्वीराज चव्हाण दिलखुलास बोलत होते.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 22, 2017 07:02 PM IST

मोदींनी लोकांना दिवास्वप्नं दाखवली- पृथ्वीराज चव्हाण

22 मे : नरेंद्र मोदींनी लोकांवर भुरळ पाडली, असं म्हणत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकांना दिवास्वप्नं दाखवल्याबद्दल पंतप्रधानांवर तोफ डागली.

निवडणुका जिंकण्यासाठी मोदी-फडणवीसांनी पोकळ आश्वासनं दिली अशी टीकाही त्यांनी केली. IBNलोकमतच्या न्यूजरूम चर्चेत पृथ्वीराज चव्हाण दिलखुलास बोलत होते.

अनेक प्रश्नांची चव्हाणांनी मनमोकळेपणानं उत्तरं दिली. ते म्हणाले, 'जीएसटीची संकल्पना मूळ चिदंबरम यांचीच होती. त्यावेळी भाजपनं अभ्यास न करता विरोध केला होता.' आमचा GST कायद्याला विरोध नाही, काही मुद्द्यांवर आक्षेप असल्याचं त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आपण ठाम असल्याचं ते म्हणाले. उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती बिकट अाहे, तेव्हा कर्जमाफी व्हायलाच हवी. देवेंद्र सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्येची संख्या वाढली, असंही ते म्हणाले.

'नारायण राणे आमच्यासोबतच, आम्ही सर्वजण एकत्र आहोत. राणेंची पक्षांतर्गत नाराजी असू शकते, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. राणे कोकणात प्रभावी नेते असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Loading...

संघर्षयात्रे दरम्यान लोकांशी आमचा चांगला संवाद झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विरोधक एकजुटीनं सरकारविरोधात लढणार आणि सत्तेत येण्याचा प्रयत्न करणार असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2017 07:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...