मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई विमानतळावरील टर्मिनल-2 अचानक केलं रिकामी, पोलीस म्हणाले घाबरण्याचं कारण नाही

मुंबई विमानतळावरील टर्मिनल-2 अचानक केलं रिकामी, पोलीस म्हणाले घाबरण्याचं कारण नाही

Mumbai Airport Mock Drill: आज सकाळी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport)एकच गोंधळ झाला होता.

Mumbai Airport Mock Drill: आज सकाळी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport)एकच गोंधळ झाला होता.

Mumbai Airport Mock Drill: आज सकाळी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport)एकच गोंधळ झाला होता.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 04 सप्टेंबर: आज सकाळी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport)एकच गोंधळ झाला होता. सकाळी विमानतळावर करण्यात आलेल्या मॉक ड्रिलमुळे (Mumbai Airport Mock Drill)गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. विमानतळावरील टर्मिनल 2 वरून प्रवाशांना त्वरित बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. प्रचंड गर्दी पाहून लोक घाबरले. मात्र, नंतर पोलिसांनी मॉक ड्रिल असल्याची माहिती दिली.

देशातील गर्दीच्या ठिकाणी वेळोवेळी मॉक ड्रिल केलं जाते. हल्ल्यासारखी परिस्थिती निर्माण करून सुरक्षेचा आढावा घेणं हा मॉल ड्रिल करण्यामागचा हेतू असतो. यावेळी सुरक्षा कर्मचारी अशा प्रकारे धावतात की जणू खरोखरच एखादी आपत्ती आली आहे.

विमानतळावरील उपस्थित प्रवाशांनी या मॉक ड्रिलचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की प्रवाशांना अचानक बसमध्ये बसवून टर्मिनलमधून बाहेर काढले जात आहे.

या वेळी कोरोनाच्या प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची तक्रारही अनेक प्रवाशांनी केली. चांगली गोष्ट म्हणजे मॉक ड्रिल असूनही विमानाच्या वेळेत काहीही बदल करण्यात आलेला नाही.

वृत्तसंस्था ANIनं दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले आहे की यावेळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मॉक ड्रिल केले जात आहे. त्यामुळे लोकांना घाबरण्याची गरज नाही.

First published:

Tags: Mumbai News