आधी अल्लाची माफी, नंतर मस्जिदीतून मोबाईल चोरी!

हे दोन्ही चोर शहरातील मोठ्या मस्जिदींमध्ये शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी जात होते.

News18 Lokmat | Updated On: Jan 29, 2019 09:08 PM IST

आधी अल्लाची माफी, नंतर मस्जिदीतून मोबाईल चोरी!

मुंबई, 29 जानेवारी : मुंबई पोलिसांनी अशा दोन चोरांना अटक केली आहे, ज्यांचा प्रताप बघून पोलीसही हैराण झाले आहे. हे दोन्ही चोर दर शुक्रवारी मस्जिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी जात होते. नमाज अदा करताना अल्लाची माफी मागून मस्जिदीतून महागडे फोन आणि बॅग घेऊन पसार होत होते. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे समोर आली.

कांदिवाली पोलिसांनी या दोन चोरांना अटक केली आहे. गुड्डू बुल्लू अंसारी आणि इसरार यूनुस खान असं या चोरांचं नाव आहे. दोघेही धारावी येथील राहणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही चोर शहरातील मोठ्या मस्जिदींमध्ये शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी जात होते. नमाज अदा करताना, 'अल्ला आम्हाला माफ करं आणि कुणी आम्हाला पकडू नये', अशी विनंती करायचे आणि त्यानंतर चोरी करून पळू जात होते.

परंतु, चोरांचे हे कृत्या अल्लालाही काही आवडले नाही. मस्जिदीमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमुळे हे चोर पकडले गेले.

या चोरांकडून 6 महागडे मोबाईल फोन मिळाले आहे. हे दोन्ही चोर कुर्ला, धारावी आणि मालवणी येथील मस्जिदीमध्ये चोरी करत होते.

Loading...

=================================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2019 09:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...