कल्याण हॉस्पिटल तोडफोड आणि पत्रकाराला मारहाण प्रकरणी चौघांना अटक

कल्याण हॉस्पिटल तोडफोड आणि पत्रकाराला मारहाण प्रकरणी चौघांना अटक

या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात २५ ते ३० जणांविरोधात सशस्त्र दंगलीसह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

  • Share this:

30 नोव्हेंबर : कल्याणमध्ये होली क्राॅस रुग्णालयात तोडफोड आणि पत्रकाराला मारहाण प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलीये.

कल्याणमधील पश्चिमेकडे होली क्रॉस रुग्णालयात सोमवारी सायंकाळच्या सुमारास मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड करत डॉक्टर, कर्मचार्‍यांसह वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला होता.

या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात २५ ते ३० जणांविरोधात सशस्त्र दंगलीसह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी पहाटे महात्मा फुले पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. योगेश किसन भोईर (२८, रा. वरप), महेश लक्ष्मण भोईर (२९, रा. वरप), अनमोल बबन भोईर (२४, रा. म्हारळ) आणि हरेष गुरुनाथ पाटील (२२, रा. सापर्डे) या चौकडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बुधवारी दुपारी कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 08:56 AM IST

ताज्या बातम्या