...तर रस्त्यावर तोडगा काढू, बेस्ट संपावर मनसेचा इशारा

...तर रस्त्यावर तोडगा काढू, बेस्ट संपावर मनसेचा इशारा

बेस्ट संपाबाबत पुढची रणनिती ठरवण्यासाठी मनसे कर्मचारी संघटनेची दुपारी तातडीची बैठक पार पडली.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी

मुंबई, 11 जानेवारी : बेस्ट कर्मचाऱ्यांचा चौथ्या दिवशीही संप सुरूच आहे. या संपावरून मनसेनं सरकारला इशारा दिला आहे. 'संपावर तोडगा निघत नसणार नसेल तर मनसे आपल्या स्टाईलने सोमवारी आंदोलन करणार', अशी भूमिका मनसेनं मांडली आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला दिशा देण्याचे आदेश यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले होते.

काल गुरुवारी संपावर तोडगा न निघाल्यामुळे बेस्ट संपाबाबत पुढची रणनिती ठरवण्यासाठी मनसे कर्मचारी संघटनेची दुपारी तातडीची बैठक पार पडली. या बैठकीला मनसे महानगर कर्मचारी संघटनेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत संपावर तोडगा निघत नसल्यानं मनसे स्टाईल आंदोलनाची भूमिका या बैठकीत घेण्यात आली आहे. 'महापालिका व्यवस्थापकाकडून जर तोडगा निघणार नसेल तर सोमवारी महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर तोडगा काढणार, असा इशारा मनसेनं बेस्ट व्यवस्थापकांना दिला. तसंच, ' रस्त्यावर तमाशा करण्याची वेळ आणू नका, आमच्या आंदोलनानंतर जी परिस्थिती उद्भवणार त्याला प्रशासन जबाबदार राहिल', असा इशाराही त्यांनी दिला. मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

तोडगा काढण्यास तयार -मुख्यमंत्री

दरम्यान, बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यास तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. हे प्रकरण कोर्टात आहे आणि कोर्टानेच सरकारला मध्यस्तीबाबत विचारलं होतं. आम्ही मध्यस्तीची तयारी दाखवली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बेस्ट चा संप संपावा अशी सगळ्यांचीच इच्छ असून लवकरच तोडगा निघेल अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

आमच्याकडे यायचं असतं -कोर्ट

बेस्टच्या संपावर आज मुंबई हायकोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे. याआधी याबाबत सुनावणी झाली. त्यादरम्यान, मुख्य न्यायाधीशांनी आंदोलकांना चांगलंच खडसावलं. 'शहराला वेठीस धरू नका, संप करण्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे यायला हवं होतं. आम्हाला याहीपेक्षा जास्त गुंतागुंतीची प्रकरणं सोडवण्याचा अनुभव आहे', असं कोर्टानं म्हटलं होतं.

उद्धव ठाकरे अपयशी?

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपावर गुरुवारी कोणताही निर्णय होऊ शकला नाही. महापौर बंगल्यात पार पडलेल्या 7 तासांच्या बैठकीतही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघालेला नाही. या बैठकीला खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता आणि बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांच्याशी चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली आहे.

=====================

First published: January 11, 2019, 4:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading