सेनेत गेलेल्या मनसेच्या चार नगरसेवकांची 'घरवापसी' ?

सेनेत गेलेल्या मनसेच्या चार नगरसेवकांची 'घरवापसी' ?

शिवसेनेत दाखल झालेले मनसेचे चार नगरसेवक पुन्हा मनसेच्या उंबरठ्यावर उभे आहे. या चारही नगरसेवकांची राज ठाकरे यांच्यासोबत बैठक सुरू आहे.

  • Share this:

25 आॅक्टोबर : 'घरी परत आले' असं म्हणून शिवसेनेत दाखल झालेले मनसेचे चार नगरसेवक पुन्हा मनसेच्या उंबरठ्यावर उभे आहे. या चारही नगरसेवकांची राज ठाकरे यांच्यासोबत बैठक सुरू आहे.

भांडूप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला. त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्तेचं समिकरण बदलं गेलं. सेनेनं आक्रमक पवित्रा घेत मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक खेचून नेले. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे मुळचे शिवसैनिकच होते, ते परत आपल्या घरी परतले अशी प्रतिक्रिया दिली होती. तर राज ठाकरे यांनी हे नीच राजकारण लक्षात ठेवीन असा इशारा दिला होता.

सेनेत पोहोचून दोन आठवडे होत नाही. तेच आता चारही नगरसेवक पुन्हा मनसेत येण्याच्या तयारीत आहे. दत्ता नरवणकर, अश्विनी भालेराव, परमेश्वर कदम आणि हर्षल मोरे हे चारही नगरसेवक सध्या राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर आहे. राज ठाकरेंसोबत बैठक सुरू आहे. त्यामुळे या चारही नगरसेवकांच्या घरवापसीची चर्चा सुरू झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2017 04:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading