बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार, राज ठाकरेंनी वाढदिवशी उचललं महत्त्वाचं पाऊल

बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार, राज ठाकरेंनी वाढदिवशी उचललं महत्त्वाचं पाऊल

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

  • Share this:

डोंबिवली, 14 जून: कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. अशा बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी मनसे डोंबिवलीने पुढाकार घेतला आहे. एमएनएस रोजगार डॉट कॉम (www.mnsrojgar.com) या वेबसाईटच्या माध्यमातून गरजुंना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांच्या हस्ते रविवारी या वेबसाईटचे लाँचिंग करण्यात आलं.

हेही वाचा...अझीम प्रेमजींनी करून दाखवलं, दीड महिन्यातच पुण्यात उभारलं 'कोरोना हेल्थ सेंटर'

मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील आणि कल्याण ग्रामीण अध्यक्ष मनोज घरत यांच्या संकल्पनेतून ही वेबसाईट बनवण्यात आली आहे.

कोरोनामुळे गेल्या 3 महिन्यांपासून देशाबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचे आर्थिक चक्र बिघडलं आहे. लॉकडाऊन जसजसा वाढत गेला तस तसा अनेकांच्या रोजगार, व्यवसाय आणि नोकऱ्यांवर संक्रांत आली. मात्र, प्रत्येक संकट हे नवीन संधी घेऊन येत असतं. यादृष्टीने विचार करत मनसेने ही वेबसाईट बनवून महाराष्ट्रातील मराठी तरुणांसाठी नोकरी-व्यवसायाची दारं उघडून दिली आहेत.

या वेबसाईटच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण तरुणींना रोजगार तर दिला जाणार आहे. त्याचबरोबर उद्योग-व्यवसाय करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांनाही त्याद्वारे भविष्यात मदत केली जाणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं आहे.

परप्रांतीय कामगार आपापल्या गावाला गेल्याने आज महाराष्ट्रातील प्रत्येक एमआयडीसीमध्ये मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ज्यामध्ये कुशल आणि अकुशल अशा दोन्ही वर्गातील मनुष्यबळाची मोठी गरज भासत आहे. या सर्व प्रकारच्या संधी मनसे या वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याचे कल्याण ग्रामीण अध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी सांगितले.

हेही वाचा.. आता या सरकारी बँकेत कोट्यवधी रुपयांची फसवणूक; सर्व शाखांना केलं अलर्ट

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त या वेबसाईटचे लाँचिंग करण्यात आलं. या उपक्रमाचे कौतुक करत त्याला राज ठाकरे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. सदर जॉब पोर्टल (वेबसाईट) बनवताना मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले, मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याच बरोबर संमिक्षा टेक्नॉलॉजीचे अमर साठे, स्पॉईना कंपनीच्या संचालिका श्रद्धा पाटील, टॅग इव्हेंटचे चिन्मय मडके व प्रमोद पवार यांनी परिक्षम घेतले.

First published: June 14, 2020, 6:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading