Home /News /mumbai /

‘थोडी संवेदनशीलता दाखवा’, अमित ठाकरेंनी मुख्यंमत्र्यांकडे केली आणखी एक मागणी!

‘थोडी संवेदनशीलता दाखवा’, अमित ठाकरेंनी मुख्यंमत्र्यांकडे केली आणखी एक मागणी!

'नर्सेस अत्यंत मोलाची आरोग्य सेवा बजावत आहेत. 'कोविड योद्धे' असा त्यांचा शाब्दिक गौरव करुन त्यांच्या समस्या सुटणार नाहीत. बंधपत्रित नर्सेसच्या समस्यांबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी.'

मुंबई 8 जुलै:  राज्यात सध्या कोरोनाविरुद्ध निकराची लढाई सुरू आहे. या लढाईत डॉक्टर्स (Doctors) आणि नर्सेस (Nurses) आघाडीवर आहेत. अत्यंत जोखमीचं हे काम असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धे असंही म्हटलं जात आहे. मात्र राज्य सरकार आर्थिक संकटात असल्याने या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली होती. मनसेचे नेते अमित ठाकरे (MNS Leader Amit Thackery) यांनी या कर्मचाऱ्यांचा पगार पूर्ववत करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारनेही अशी मागणी होत असल्याने पगार पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला होता. अमित ठाकरे यांनी नर्सेसच्या पगाराबद्दली फेसबुक पोस्ट लिहून अशीच मागणी केली आहे. थोडी संवेदनशीलता दाखवा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये अमित ठाकरे म्हणतात,  राज्यातील बंधपत्रित डॉक्टर्स आणि अधिपरिचारिका (नर्सेस) यांच्या पगारातील कपात रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. या मागणीनंतर राज्य सरकारने बंधपत्रित डॉक्टरांचा पगार सुमारे १५-२० हजारांनी वाढवला, म्हणजे पूर्ववत केला. दुर्दैवाने, बंधपत्रित नर्सेसबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. बंधपत्रित नर्सेसना (ज्यात सिस्टर्स आणि ब्रदर्स दोन्ही येतात) करोना संकटकाळाच्या आधी रु ३५,००० ते रु. ४५,००० मासिक मानधन मिळत होते. २९ एप्रिलच्या शासन आदेशाद्वारे त्यांचे मानधन रु २५,००० करण्यात आले. २०१५पर्यंत या बंधपत्रित नर्सेसना सेवेत कायम केलं जात होतं. मात्र, २०१५नंतरच्या नव्या बंधपत्रित नर्सेसना कायम सेवेत घेण्याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. म्हणजे, एकीकडे नोकरीची असुरक्षितता आणि दुसरीकडे पगारकपात असा दुहेरी अन्याय बंधपत्रित नर्सेसवर होत आहे.
सध्याच्या कोविड संकटकाळात बंधपत्रित नर्सेस अत्यंत मोलाची आरोग्य सेवा बजावत आहेत. 'कोविड योद्धे' असा त्यांचा शाब्दिक गौरव करुन त्यांच्या समस्या सुटणार नाहीत. बंधपत्रित नर्सेसच्या समस्यांबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी. अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या