पाकिस्तानी गायकांची गाणी वाजवल्यास 'सर्जिकल स्ट्राईक' - मनसे

पाकिस्तानी गायकांची गाणी वाजवल्यास 'सर्जिकल स्ट्राईक' - मनसे

मनसेनं आता रेडिओ वाहिन्यांना पत्र लिहित सर्जिकल स्ट्राईकचा इशारा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 18 फेब्रुवारी : म्युझिक कंपन्यांनंतर आता मनसेनं रेडिओ वाहिनींना देखील पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये मनसेनं पाकिस्तानी गायकांची गाणी वाजवू नये असं म्हटलं आहे. आपल्या रेडिओ वाहिनीच्या करोडो श्रोत्यांच्या पाकिस्तानबाबतच्या संतप्त भावना लक्षात घेऊन आपण पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी आपल्या रेडिओ वाहिनीवर वाजवणं तत्काळ थांबवावं. अन्यथा गाणी बंद करण्यासाठी 'सर्जिकल स्ट्राईक' कसा करायचा हे मनसेला ठावूक असल्याचं पत्रामध्ये म्हटलं आहे.

यापूर्वी देखील मनसेनं म्युझिक कंपन्यांना पत्र पाठवून पाकिस्तानी गायकांवर बंदी आणावी अशी मागणी केली होती.

टी - सीरीजनं काढली गाणी

दरम्यान, टी - सीरीज या कंपनीनं पाकिस्तानी गायकांची गाणी यु ट्युबवरून काढून टाकली आहेत. काही दिवसांपूर्वी टी- सीरीजनं आतीफ असलम आणि राहत फते अली खान या गायकांसोबत काम केलं होतं. त्यामुळे आता व्हॅलेंटाईनच्या दिवशी देखील प्रदर्शित झालेलं बारिशें गाणं यूट्यूबवर दिसणार नाही. मनसेनं लिहिलेल्या पत्रानंतर टी - सीरीजनं हे पाऊल उचललं आहे.

पाक कलाकारांना बॉलिवूडमध्ये 'नो एन्ट्री'

रविवारी ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’कडून (FWICE) पुलवामा हल्ल्याचा निषेध केला गेला. यावेळी पाकिस्तानी कलाकारांना यापुढे बॉलिवुडमध्ये स्थान दिले जाणार नाही. शिवाय, त्यांची गाणी देखील रिलीज केली जाणार नाहीत अशी घोषणा करण्यात आली. रविवारी दोन तासासाठी फिल्म सीटीतील कामकाज बंद ठेवण्यात आलं होतं.

सिद्धू 'आऊट'

तसेच माजी क्रिकेटर आणि पंजाबमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर देखील बंदी घालत असल्याची घोषणा FWICEनं रविवारी केली . पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी दहशतवादासाठी पाकिस्तान देशाला जबाबदार धरता येणार नाही असं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष पाहायाला मिळत आहे. यानंतर सोनी वाहिनीनं देखील त्यांची 'द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी केली आहे.

video viral: 'कश्मीर किसी के अब्बा की जागीर नही', ४ वर्षांच्या नवेलीचा पाकला दम


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 06:44 PM IST

ताज्या बातम्या