• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कॅन्सर पीडित रुग्णाचे पैसे बुडवणाऱ्या शेट्टीला मनसेसैनिकांनी बेदम धुतले
  • VIDEO : कॅन्सर पीडित रुग्णाचे पैसे बुडवणाऱ्या शेट्टीला मनसेसैनिकांनी बेदम धुतले

    News18 Lokmat | Published On: Feb 12, 2019 11:25 PM IST | Updated On: Feb 12, 2019 11:25 PM IST

    12 फेब्रुवारी : रुग्णाची फसवणूक करणाऱ्या हॉटेलचालकाला मनसेच्या ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी चांगलाच चोप दिला. मुंबईलगतच्या विरारमध्ये राजू शेट्टी नावाच्या हॉटेलचालकानं कॅन्सर पीडित रुग्णाला लाखोचा गंडा घातल्याचा आरोप आहे. या संदर्भात फसवणूक झालेल्या रुग्णानं मनसे ठाणे जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यांनी शेट्टीला गाठलं आणि त्याला बेदम चोप दिला. हॉटेल चालकाला बदडताना अविनाश जाधवांनी फेसबुक लाईव्ह केलं आहे. याआधीही ठाण्यामध्ये रिक्षाचालकाने मराठी तरुणाला मारहाण केली होती. तेव्हा मनसेचे पदाधिकारी नितीन नांदगावकर यांनी रिक्षाचालकाला मारहाण केली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading