पनवेलमध्ये मनसैनिकांनी फेरीवाल्यांना हुसकावलं; आंदोलनाचं नियोजन करा-राज ठाकरे

पनवेलमध्ये मनसैनिकांनी फेरीवाल्यांना हुसकावलं; आंदोलनाचं नियोजन करा-राज ठाकरे

त्यानंतर आता पनवेल तालुक्यात कामोठे इथे मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने असणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांनी चोप दिला आहे.

  • Share this:

पनवेल, 27 नोव्हेंबर: विक्रोळीमध्ये आज सकाळी मनसैनिकांवर हल्ला झाल्यानंतर मनसैनिक चवताळले होते. आंदोलनाचं नियोजन करा असं राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना खडसावलं होतं. त्यानंतर आता पनवेल तालुक्यात कामोठे  इथे मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने असणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांनी चोप दिला आहे.

पनवेल इथे फेरीवाल्यांना चोप देऊन मनसैनिकांनी पळवून लावलं आहे. फेरीवाल्यांच्या गाड्यांची नासधूस केली आहे. गेल्या काही काळापासून या भागात फेरीवाल्यांची मुजोरी वाढली होती, फेरीवाल्यांनी रस्ते अडवले होते तसंच स्थानिक लोकांसोबत यांची अरेरावी वाढली होती. म्हणून मनसैनिकांनी आक्रमक आंदोलन केलं आहे. मनसैनिक सुधीर नवले यांच्या नेतृत्वाखाली मनसेचं आंदोलन झालं आहे.

पण काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांना मार देणारे मनसे कार्यकर्ते आता स्वत:च मार खाऊ लागले आहेत. विक्रोळीत मनसेच्या विश्वजीत ढोलम यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना आज सकाळी जबर मारहाण झाली होती. या हल्ल्यामागे काँग्रेस असून हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांनी केला होता. या हल्ल्यानंतर राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीनं बैठक बोलवली. मराठी पाट्यांसाठीच्या आंदोलनाचं नियोजन चुकल्याचं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सुनावलं होतं. तसंच मनसे पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणीही केली होती.

त्यामुळे आता मनसे-फेरीवाला वाद पुढे काय वळण घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 27, 2017, 7:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading