संजय निरुपमांच्या सभेत मनसैनिकांचा राडा

संजय निरुपमांच्या सभेत मनसैनिकांचा राडा

या सभेत मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

  • Share this:

25 नोव्हेंबर : मुंबईत घाटकोपरमध्ये काँग्रेसचे मुंबईचे शहराध्यक्ष संजय निरुपम यांच्या सभेत मनसे कार्यकर्त्यांनी राडा घातलाय. त्यामुळे ही सभा निरुपम यांना आवरती घ्यावी लागली.

फेरीवाल्यांच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि संजय निरूपम यांच्यात वाद सुरू आहे.   आज घाटकोपरच्या नायडून कॉलनी परिसरातील नालाबाधित झोपडपट्टीला वाचवण्यासंबंधी काँग्रेसची सभा होती. या सभेत मनसैनिकांनी घसून राडा घातला. स्टेजवर मनसे कार्यकर्त्यांनी पोहोचण्याचा प्रयत्न केला. तसंच या सभेत मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

First published: November 25, 2017, 5:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading