S M L
Football World Cup 2018

डोंबिवलीत मनविसेच्या उपजिल्हाध्यक्षाला घरातून खेचून मारहाणीचा प्रयत्न

या हल्ल्यमागे कोणाचा हात होता ? याचा तपास पोलीस करत आहे.

Sachin Salve | Updated On: Mar 13, 2018 07:31 AM IST

डोंबिवलीत मनविसेच्या उपजिल्हाध्यक्षाला घरातून खेचून मारहाणीचा प्रयत्न

13 मार्च : डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उप जिल्हाध्यक्ष समीर पालांडे यांच्यावर राहत्या घरी 2 अज्ञातांनी हल्ला केलाय. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीये. या हल्ल्यात त्यांच्या पाठीला दुखापत झालीये.

मंगळवारी पहाटे समीर पालांडे घराच्या दरवाज्यात असता त्यांना दोन अज्ञात इसमांनी घराबाहेर अडवून तुझ्याशी बोलायचं आहे, असं सांगत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पालांडे यांनी मी तुम्हाला ओळखत नाही, असं सांगून त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला. त्यानंतर याच अनोळखी इसमानी पालांडे यांना मारहाण करत घराबाहेर खेचण्याचा जोरदार प्रयत्न केला.

मात्र पालांडे हे लगेच घरात घुसले. घराबाहेरील आरडा-ओरड एकूण त्यांचे आई-वडील धावत आले. इमारतीतील रहिवाशी जागे होतील आणि आपण पकडले जाऊ, या भीतीने हल्लेखोर पळून गेले. या मारहाणीत पालांडे यांच्या पाठीला मार लागला आहे. माझे कोणाही वैर नसून कुणावरही संशय नाही. हल्लेखोरांमधील एकाजवळ लोखंडी रॉड होता, असंही पालांडे यांनी सांगितलं. या हल्ल्यमागे कोणाचा हात होता ? याचा तपास पोलीस करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 07:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close