शिवसेनेचा वाघ भित्रा आहे का?, मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सवाल

महिलांचा अपमान करमाऱ्या महापौरांनी निवेदन द्यायला आलेल्या महिलांना पोलिसांची भीती दाखवण्यात येत आहे. शिवसेनेचा वाघ भित्रा आहे का? असा मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सवाल केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 03:22 PM IST

शिवसेनेचा वाघ भित्रा आहे का?, मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सवाल

मुंबई, 8 ऑगस्ट- विजेचा धक्का लागून आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (4 ऑगस्ट) मुंबईत घडली. मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर गेले असता काही महिलांनी त्यांची वाट अडवायचा प्रयत्न केला. अशा घटना घडतात, तेव्हा कुठे होतात, असा जाब एका महिलेने या वेळी विचारला. 'माझ्यावर दादागिरी करतेस का, असं विचारत महापौरांनी तिचा हात पिरगाळला. महापौरांचं हे वर्तन कॅमेऱ्यात कैद झालं आहे. यावरून मनसेच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर बंगल्याबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शिवसेनेचा वाघ भित्रा आहे का? असा सवाल मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

शिवसेनेचा वाघ भित्रा आहे का?

महापौर बंगल्याबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महापौरांना निवेदन द्यायला आलेल्या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांना बंगल्याबाहेरच रोखण्यात आले आहे. मुंबईच्या महापौर बंगल्याला पोलिस छावणीचे रुप आले आहे. पूर्वकल्पना देऊनही महापौर मुंबईकरांना साधे निवेदन देऊ देत नाही. महिलांचा अपमान करमाऱ्या महापौरांनी निवेदन द्यायला आलेल्या महिलांना पोलिसांची भीती दाखवण्यात येत आहे. शिवसेनेचा वाघ भित्रा आहे का? असा मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सवाल केला आहे.

काय म्हणाले महापौर?

दरम्यान, याविषयी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना विचारले असता ते म्हणाले, मी फक्त हाताने महिलांना बाजूला केले. आरोप करणारे राजकारण करत आहेत. मनसेने अपघाताचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.

Loading...

महिला विनयभंग प्रकरणी मनसे आक्रमक...

सांताक्रूज येथील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केली. शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील मनसेच्या शिष्टमंडळाने वांद्रे-कुर्ला संकुल पोलीस स्टेशन झोन 8 चे उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांची भेट घेतली आणि त्यांना महापौरांच्या विरोधातील पुराव्यांची सविस्तर माहिती दिली.

तीन दिवसांपूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असताना सांताक्रूझ- वाकोला येथील पटेलनगरमध्ये माला नागम व संकेत नागम या मायलेकांचा विजेच्या धक्क्याने बळी गेला. या घटनेनंतर त्या परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाचा भडका उडाला. तिथल्या स्थानिक महिलांनी महापौरांना गराडा घातला. या संतप्त महिलांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी महापौरांनी महिलांना उद्देशून "ए दादागिरी करू नकोस, तुला माहीत नाही मी कोण आहे" असं वक्तव्य केलं. इतकंच नव्हे तर, एका तरुणीचा हात पकडून तो मुरगळण्यापर्यंत महापौरांची मजल गेली. "शेकडो लोकांच्या उपस्थितीत हे दुष्कृत्य करण्याचा माजोरडेपणा महापौरांनी केला. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना व्हिडिओत कैद झाली आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून अवघ्या देशाला 'मुंबईच्या महापौरांचे प्रताप' समजले आणि प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाची मान शरमेने खाली गेली", असं मत शालिनी ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.

पोलीस काय करतात?

अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, या व्हिडिओत महापौरांच्या बाजूला काही पोलीस कर्मचारी दिसत आहेत. महापौर स्थानिक महिलांना दमदाटी करत असताना आणि एका महिलेचा हात मुरगळून विनयभंग करत असतानाही या पोलीस कर्मचा-यांनी महापौरांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. ही बाब मुंबई पोलीस दलाला निश्चितच शोभणारी नाही. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी महापौरांना महिलेचा विनयभंग करण्यापासून का रोखले नाही, याचाही जाब आपण संबंधित पोलीस कर्मचा-यांना विचारावा तसंच त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीसुद्धा शालिनी ठाकरे यांनी यावेळी केली.

योग्य कारवाईचं पोलिसांचं आश्वासन..

घटनाप्रसंगी जे पोलीस कर्मचारी तिथे उपस्थित होते, त्यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. महिलांची सुरक्षितता हे आमचं सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट आहे, असं आश्वासन पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिलं. मनसेच्या शिष्टमंडळात स्थानिक विभाग अध्यक्ष सुनील हर्षे, महिला विभाग अध्यक्ष शिल्पा नाईक, उपविभाग अध्यक्ष अखिल चित्रे, महिला उपाध्यक्ष सुगंधा शेट्ये, महिला सचिव शबनम शेख यांचा समावेश होता. याप्रसंगी पश्चिम उपनगरातील मनसेच्या शेकडो महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

लज्जास्पद! मुंबईच्या महापौरांनी महिलेचा हात पिरगळला VIDEO आला समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2019 03:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...