मनसे करणार एका घोटाळ्याचा पर्दाफाश, दुपारी बोलावली पत्रकार परिषद

मनसे करणार एका घोटाळ्याचा पर्दाफाश, दुपारी बोलावली पत्रकार परिषद

कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या शवपिशव्याबाबत गंभीर आरोप केला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जून : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मुंबईत कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. अशातच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सणसणीत आरोप केला आहे. याबद्दल ते दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या शवपिशव्याबाबत गंभीर आरोप केला आहे. या पिशव्यांच्या किंमतीमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत आज दुपारी मनसेच्या वतीने मुंबईत पत्रकार परिषद बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे काय खुलासा करता हे पाहण्याचे ठरणार आहे.

मुंबई 1000 मृत्यूचे आकडे लपवले - फडणवीस

दरम्यान, मुंबईत रुग्णालयांबाहेर झालेले पण विविध प्राधीकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले सुमारे 1000 मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखविण्यात आलेले नाहीत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.

आकडेवारीची अचूकता हाच कोरोनाविरोधातील लढाईसाठी विश्लेषणाचा मुख्य आधार असल्याने याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावं, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.

मुंबईत ज्या रुग्णांचा मृत्यू रुग्णालयाबाहेर झालेला आहे, असे मृत्यू अद्यापही दाखविण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकारी किंवा तत्सम प्राधीकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले आहे, अशांचा आकडा अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असेही किमान 1000 मृत्यू मुंबईत आहेत. ज्यांना अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेलं नाही, असा दावा फडणवीसांनी केला.

संपादन - सचिन साळवे

First published: June 26, 2020, 9:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading