टिकटिक...मनसे लोकसभेचं 'टायमिंग' साधणार की विधानसभेचं?

टिकटिक...मनसे लोकसभेचं 'टायमिंग' साधणार की विधानसभेचं?

लोकसभा निवडणुकीकरता राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 9 मार्च : लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. पण, सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ते मनसेच्या भूमिकेकडे. लोकसभा निवडणुकीसाठी मनसे आघाडीमध्ये सामील होणार अशी चर्चा होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी चर्चा केल्यानं या चर्चेला अधिक उधाण आलं. पण, तूर्तात तरी मनसे आघाडीत येणार का? यावर काहीही निर्णय झालेला नाही. मनसेकरता राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असली तरी काँग्रेसनं मात्र त्याला नकार दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मनसेच्या 13व्या वर्धापनदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

आयकर विभागाची धाड, 'आप'च्या आमदाराकडून 2 कोटी 56 लाखांची रोकड जप्त

लोकसभा कि विधानसभा?

लोकसभा निवडणुकीत मनसेनं कल्याण आणि ईशान्य मुंबई या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याबाबत राष्ट्रवादीशी बोलणी देखील सुरू होती. पण, आता मात्र मनसे लोकसभा नाही तर विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असल्याचं समोर आलं आहे. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या बैठकीमध्ये राज यांचा कल हा विधानसभा निवडणुकांकडे होता, अशी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे मनसे लोकसभेच्या रणात उतरणार की विधानसभेच्या? हे पाहावं लागणार आहे.

तर, लोकसभेकरता मनसे राष्ट्रवादीला मदत करून विधानसभेत राष्ट्रवादीच्या साथीनं आमदार निवडून आणणार का? अशी देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बडगाममध्ये भारतीय लष्कराच्या एका जवानाचं दहशतवाद्यांकडून अपहरण

राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष

दरम्यान, राज ठाकरे यांनी 13व्या वर्धापन दिनी मी भूमिका स्पष्ट करेन अशी माहिती यापूर्वीच दिली आहे. शिवाय, बरचं काही गोळा करून ठेवलं आहे, असं विधान देखील राज यांनी केलं होतं. त्यामुळे वर्धापन दिनी राज काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. 2014च्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये मनसेचं इंजिन रूळावरून घसरलं. शिवाय, मुंबई पालिका निवडणुकीमध्ये देखील मनसेला केवळ सात जागाच जिंकता आल्या. त्यानंतर नगरसेवकांनी भगवा हातात घेतल्यानं मनसेला मोठा धक्का बसला.

या सर्व घडामोडी पाहता मनसेकरता लोकसभा निवडणूक देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Special Report : रेस्क्यूचा थरार, 50 फूट खोल विहिरीतून 2 बिबट्यांना काढलं बाहेर

First published: March 9, 2019, 8:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading