भयंकर वासाने डोंबिवलीकरांचा श्वास गुदमरला, मनसेनं दिला 'खळखट्याक'चा इशारा

भयंकर वासाने डोंबिवलीकरांचा श्वास गुदमरला, मनसेनं दिला 'खळखट्याक'चा इशारा

आज पहाटेपासून डोंबिवली एमआयडीसीसह पूर्व- पश्चिम ठाकुर्ली आदी भागात उग्र दर्प येत होता. त्यामुळे अनेक नागरिकांना श्वास घ्यायलाही त्रास झाला.

  • Share this:

प्रदीप भणगे, प्रतिनिधी

डोंबिवली, 11 डिसेंबर :  डोंबिवली एमआयडीसीतील वायू प्रदूषणावर एमपीसीबीने ( महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) तातडीने उपाय योजना न केल्यास मनसेने आपल्या स्टाईलने आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे निवेदन देत असताना सर्व कार्यकर्त्यांनी मास्क घालत एमपीसीबी अधिकाऱ्यांचा निषेध केला.

प्रदूषणाची नगरी म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या डोंबिवलीत आज पुन्हा एकदा गॅसच्या उग्र दर्पानं डोंबिवलीकरांचा श्वास गुदमरला. वारंवार होणाऱ्या या त्रासाने डोंबिवलीकर अक्षरशः हैराण झाले आहेत.

डोंबिवली पूर्व, पश्चिम, ठाकुर्ली आणि परिसरात काल मध्यरात्रीपासून कुजट वास पसरला होता. यामुळे नागरिकांना श्वास घेणंही मुश्कील झालं होतं. हा दर्प डोंबिवलीच्याच खंबाळपाडा एमआयडीसी भागातून गॅस उत्सर्जन करण्यात आल्यामुळे झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

आज पहाटेपासून डोंबिवली एमआयडीसीसह पूर्व- पश्चिम ठाकुर्ली आदी भागात उग्र दर्प येत होता. त्यामुळे अनेक नागरिकांना श्वास घ्यायलाही त्रास झाला. हा उग्र दर्प नेमका कशामुळे आणि कुठून येत होता याची माहिती समोर येऊ शकली नाही. मात्र एमआयडीसी परिसरातील रासायनिक कंपनीतून हा वायू सोडल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी डोंबिवली शहर मनसेने एमपीसीबी अधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. तसंच लवकरात लवकर हा वायू प्रदूषणाचा मुद्दा सोडवावा अन्यथा आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा दिला.

तसंच डोंबिवलीतही एमपीसीबीचे कार्यालय सुरू करण्याची मागणी मनसेने केली आहे. यावेळी डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, मनसे गटनेते मंदार हळबे, प्रथमेश खरात, वेद पांडे, सचिन कस्तुर, विशाल बडे, विशाल बडे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

याआधीही केमिकलचं सांडपाणी नाल्यात!

डोंबिवलीत आणि विशेषतः खंबाळपाडा परिसरात यापूर्वीही केमिकलचं सांडपाणी नाल्यात सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण झालं होतं. त्यानंतरही सातत्यानं असे प्रकार सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर मनसेनं याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.  तर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण मधील प्रदूषण नियंत्रण मंडळ डोंबिवली एमआयडीसी हलवण्यात यावं, अशी केली आहे आणि सदर प्रदूषणाचा विषय येणाऱ्या नागपूर अधिवेशनात उचलणार असल्याचं ही सांगितलं.

Published by: sachin Salve
First published: December 11, 2019, 7:35 PM IST
Tags: dombivali

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading