मनसेनं ८ च्या आधीच फोडले फटाके, कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन

मनसेनं ८ च्या आधीच फोडले फटाके, कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन

दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवामध्ये रात्री 8च्या आधीच फटाके फोडण्यात आले.

  • Share this:
मुंबई, 04 नोव्हेंबर : दिवाळीत फटाके फोडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं मनसेकडून उल्लंघन झाल्याचं दिसतंय. दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवामध्ये रात्री 8च्या आधीच फटाके फोडण्यात आले.दिवाळीत रात्री 8 ते 10 वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहेत. तसंच या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. पण तरीही मनसेनं आमची दिवाळी उद्यापासून आहे असं सांगून शिवाजी पार्कामध्ये फटाके फोडले. विशेष म्हणजे मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सवाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सपत्नीक उपस्थित होता. तसंच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंही हजर होते.


दरम्यान या प्रकरणावर मनसे नेत्यांनी सारवासारव सुरू केली आहे. आमची दिवाळी उद्यापासून आहे तर आज फटाके फोडायला हरकत नव्हती. आम्हाला वाटले म्हणून आम्ही आज दीपोत्सव साजरा केला असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं.


फटाक्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले आहे. त्यानुसार, दिवाळीला संध्याकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत फटाके फोडता येतील. तर, इतर सणांसाठी म्हणजेच नवीन वर्ष, नाताळ यासाठी रात्री ११.५५ ते १२.३० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने आपल्या निर्णयात बदल केला असून दिवाळीसाठी राज्य सरकार फटाके फोडण्याबाबतची वेळ ठरवू शकेल, असे कोर्टाने म्हटले आहे.


असे असले तरी एका दिवसात केवळ दोनच तास फटाके फोडता येतील, हेही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.


=======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2018 10:14 PM IST

ताज्या बातम्या