महाराष्ट्राला तलवारीच्या धारेचा इतिहास आहे-मनसेचा फेरीवाल्यांना इशारा

महाराष्ट्राला तलवारीच्या धारेचा इतिहास आहे-मनसेचा फेरीवाल्यांना इशारा

मनसे पुन्हा खळ्ळखट्याकच्या तयारीत आहे का अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे.

  • Share this:

29 नोव्हेंबर  : महाराष्ट्राला तलवारींच्या धारेचा इतिहास आहे अशी  धमकी मनसे नेते संदीप देशपांडेंनी फेरीवाल्यांना दिली आहे.   मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्यांनी  या धमकीचा व्हिडिओ अपलोड केलाय.

हा राज ठाकरेंच्या भाषणाचा जुना व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये   पुन्हा तोच इतिहास घडेल असं म्हटलंय. मनसे पुन्हा खळ्ळखट्याकच्या तयारीत आहे का अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. विक्रोळीत मनसे  कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे.  मनसेनं फेरीवाले आणि काँग्रेसला थेट धमकीच दिली आहे. विसरू नये की महाराष्ट्राला तलवारींच्या धारेचा इतिहास आहे. तोच इतिहास पुन्हा घडेल! असा मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काँग्रेसला इशारा दिलाय.

विक्रोळीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलेल्या ट्विटला मनसेनं उत्तर दिलंय.

रविवारी दुपारी विक्रोळीत काही दुकानदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप मनसेनं केला होता. त्यानंतर मनसेवर टीका करणारं ट्विट संजय निरूपम यांनी केलं होतं .  या ट्विटला मनसेने मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. दोन हजार मैलांवरून महाराष्ट्रात येऊन दादागिरीने लाठ्याकाठ्या बरसल्या तर हे विसरू नये की महाराष्ट्राला तलवारींच्या धारेचा इतिहास आहे..तोच इतिहास पुन्हा घडेल! असा मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मनसेने इशारा दिला आहे.

मनसे-काँग्रेसचं हे फील्डवरचं राजकारण आता ट्विटरवरही गाजू लागलं आहे. मनसेनं ट्विटरवर दिलेली धमकी आता फील्डवर कितपत खरी उतरणार हेच बघायचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 06:33 PM IST

ताज्या बातम्या