S M L

'मागितले असते तर सर्व सात दिले असते', मनसेचा शिवसेनेवर निशाणा

मनसेच्या सहा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशानंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेनेत पोस्टरवॉरला सुरुवात झालीय. मनसेनं दादरला असणाऱ्या शिवसेना भवनाबाहेर एक पोस्टर लावून सेनेला टार्टेग केलंय.

Sonali Deshpande | Updated On: Oct 15, 2017 09:56 AM IST

'मागितले असते तर सर्व सात दिले असते', मनसेचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई, 15 आॅक्टोबर : मनसेच्या सहा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशानंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेनेत पोस्टरवॉरला सुरुवात झालीय. मनसेनं दादरला असणाऱ्या शिवसेना भवनाबाहेर एक पोस्टर लावून सेनेला टार्टेग केलंय.

'मागितले असते तर सर्व सात नगरसेवक दिले असते. मात्र चोरून सहा नगरसेवक घेऊन गेले' असा टोला मनसेनं हाणलाय. कठीण परिस्थिती जन्म घेते तेव्हाच जिद्द जन्म घेते,  असंही मनसेनेनं लावलेल्या होर्डिंगमध्ये म्हटलंय.

भांडुप महापालिकेत भाजपचा विजय झाल्यानंतर मुंबई पालिकेच्या सत्ता समिकरणात बदलणार याची जाणीव होताच शिवसेनेनं मनसेचे सात नगरसेवक फोडले.संजय तुर्डे यांनी घडलेली सगळी हकीकत आयबीएन लोकमतला सांगितली. फोडाफोडी होण्याआधी गटनेते दिलीप लांडे यांनी राजगडावर सगळ्या नगरसेवकांची बैठक घेतली होती. तेव्हा आम्ही सगळे आमच्या प्रभागात चांगले असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी राज ठाकरे यांना निरोप कळवतो असं सांगितलं होतं. पण दोन-तीन दिवसांपासून काही तरी वेगळंच घडत असल्याची पाल चुकचुकली होती. मामा लांडे हे राज ठाकरेंचे खास विश्वासू होते. ते असं काही करतीला याचा अंदाज नव्हता. आज आमचे सगळे नगरसेवक सोडून गेले, यांचं दु:ख वाटतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 15, 2017 09:47 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close