...तर बिल्डरला खळ्ळ-खट्याक, मनसेनं आळवला मराठीचा सूर

मांसाहार करतात म्हणून यापुढे कोणत्याही बिल्डरनं जर मराठी माणसाला कोणीही घर नाकारलं तर त्या बिल्डरला रस्त्यावर आणून कानफटात लगावू असा इशारा मनसेनं दिला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2017 07:05 PM IST

...तर बिल्डरला खळ्ळ-खट्याक, मनसेनं आळवला मराठीचा सूर

25 एप्रिल : मांसाहार करतात म्हणून यापुढे कोणत्याही बिल्डरनं जर मराठी माणसाला कोणीही घर नाकारलं तर त्या बिल्डरला रस्त्यावर आणून कानफटात लगावू असा इशारा मनसेनं दिला आहे.

महापालिका निवडणुकीत सपाटून पराभवाला सामोरं गेलेल्या मनसेनं आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात केलीये. मनसेनं पुन्हा एकदा मराठीचा सूर लगावलाय. मराठी माणसाला घऱं नाकारणाऱ्या बिल्डरांविरोधात मनसेनं आता आघाडी उघाडलीये.

मनपातले पहारेकरी आणि कैवारी या प्रश्नावर गप्प का असा सवाल भाजप आणि शिवसेनेला मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. या विषयी कोणतीही तक्रार असल्यास आम्ही त्याची दखल घेऊ असंही देशपांडे यांनी म्हटलं आहे. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दोन वर्षांपूर्वी गटनेता असताना या संदर्भात मांसाहार करतायेत म्हणून कुणाला घर नाकारल्यास अशा बिल्डर्सच्या इमारतीचं पाणी आणि वीज पुरवठा खंडीत करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता.

भाजप वगळता इतर पक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता आणि अंमलबजावणीसाठी प्रशासनाने पाठवला होता. पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातर्फे त्यावेळेस तांत्रिक मुद्द्यांनुसार इमारतीच्या बांधकामाला परवानगी दिली जाते. तसंच विकास नियंत्रण नियमावलीत अशाप्रकारच्या कारवाईची तरतूद नसल्यामुळे पालिका कारवाई करू शकत नाही, असा अहवाल प्रशासनाने मागील वर्षी प्रसिद्ध केला होता.

हा अहवाल मंजूर न करता फेरविचारासाठी प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता.विकास नियंत्रण नियमावलीत बिल्डरला बांधकाम सुरू करण्याचे प्रमाणपत्र नाकारण्याचे किंवा जलजोडणी खंडित करण्याच्या कारवाईची तरतूद करता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 07:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...