शिवसेनेला उत्तर भारतीयांची मतंही पाहिजे आणि हप्ताही - संदीप देशपांडे

शिवसेनेला उत्तर भारतीयांची मतंही पाहिजे आणि हप्ताही - संदीप देशपांडे

शिवसेनेला उत्तर भारतीय लोकांची मते ही पाहिजे आणि हप्ते ही पाहिजे अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 25 ऑक्टोबर : शिवसेनेला उत्तर भारतीय लोकांची मते ही पाहिजे आणि हप्ते ही पाहिजे अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. आज काही शिवसैनिकांनी उत्तर भारतीयांना जागेच्या वादावरून मारहाण केली त्याच प्रकरणी मनसेने शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवेसना नेते एका बाजूला म्हणतात 'उत्तर भारतीय के सन्मान ने शिवसेना मैदान मे' आणि दुसरीकडे त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचं देशपांडे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे ओला-उबेर कंपन्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार काही करत नाहीत असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

तर ओला आणि उबरप्रमाणे भविष्यात मनसे अॅप करण्याचा विचार करत असल्याचंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या 4 दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी करत आहेत.

आज राज ठाकरे यांनी जगप्रसिद्ध लोणार सरोवराला भेट दिली असून उल्कापातामुळे तयार झालेल्या या एकमेव खाऱ्यापाण्याच्या सरोवराची माहिती जाणून घेतली. यावेळी मनसेचे बाळा नांदगावकरही उपस्थित होते.

दरम्यान, मुंबईतल्या प्रभादेवी परिसरात एका उत्तर भारतीयाला शिवसैनिकांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. स्टॉल लावण्याच्या वादातून ही मारहाण करण्यात आली आहे. स्थानिक शिवसैनिकाच्या पत्नीच्या जागेवर उत्तर भारतीय युवकानं स्टॉल लावला होता.

त्यामुळे त्याला शिवसेनेकडून मारहाण करण्यात आली आहे. या संदर्भात दादर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूकडून एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

LIVE VIDEO: स्फोटात दोघांचा मृत्यू तर बाकी जण जीव मुठीत घेऊन पळाले

 

 

First published: October 25, 2018, 1:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading