पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त, राज ठाकरेंच्या वाढदिवसाची मुंबईकरांना भेट

पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त, राज ठाकरेंच्या वाढदिवसाची मुंबईकरांना भेट

येत्या 14 जून रोजी मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येईल अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली.

  • Share this:

मुंबई, 30 मे : देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला असताना मनसेनं मुंबईकरांना एका दिवसासाठी का होईना दिलासा दिलाय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे १४ जूनला मुंबईतील पेट्रोल पंपांवर दुचाकी वाहनांमध्ये प्रती लीटर ४ रुपयांनी स्वस्त पेट्रोल दिलं जाणार आहे.

येत्या 14 जून रोजी मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येईल अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली.

तसंच आज पेट्रोल १ पैशांनी स्वस्त झाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात जोडून आभार मानतो अशी खोचक प्रतिक्रिया देशपांडे यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

पेट्रोलच्या दरात 59 पैशांनी नाही तर फक्त 1 पैशांनी घट

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या 16 दिवसांपासून गगणाला भिडले होते पण अनेक दिवसांनंतर इंधनाच्या दरात घट झाली. पण 59 पैशांनी नाही तर फक्त 1 पैशांनी. पेट्रोलच्या दरात ५९ पैशांनी नाही तर 1 पैशांची घट झाली आहे. इंधन कंपन्यांकडून ही तांत्रिक चूक झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.

तर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची भाजी-पाल्यांवरही पहायला मिळाला. कारण नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर काल 20 ते 30 टक्क्यांनी वाढले होते. इंधन दरवाढीचा थेट परीणाम वाहतुकीवर होतोय. अशात कडाक्याच्या उन्हामुळं भाज्यांची आवक देखील कमी झालीय. त्यामुळं भाज्यांच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झालीय.

मुंबईला भाजी पुरवठा करणाऱ्या पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात उन्हाची झळ वाढलीय. त्यामुळे भाज्यांचं उत्पादन देखील कमी झालंय. त्यातच डिझेल, पेट्रोल चे भाव ही वाढल्याने वाहतूकदारांनी आपल्या दरात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

First published: May 30, 2018, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading