...ही तर लोकशाहीची पायमल्ली, मनसे सेनेवर भडकली

...ही तर लोकशाहीची पायमल्ली, मनसे सेनेवर भडकली

मनसेनं निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून या गटाला मान्यता देऊ नये अशी मागणी केलीये. तसंच ही लोकशाही पायमल्ली आहे अशी टीकाही करण्यात आलीये.

  • Share this:

13 आॅक्टोबर : शिवसेनेनं मनसेचे सहा नगरसेवक फोडल्यामुळे मनसेच्या गोटात खळबळ उडालीये. मनसेनं निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून या गटाला मान्यता देऊ नये अशी मागणी केलीये. तसंच ही लोकशाही पायमल्ली आहे अशी टीकाही करण्यात आलीये.

भांडूप महापालिकेत भाजपचा विजय झाल्यानंतर मुंबई पालिकेच्या सत्ता समिकरणात बदलणार याची जाणिव होताच शिवसेनेनं मनसेचे सात नगरसेवक फोडले.

याबद्दल मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहले. या पत्रात राजकीय पक्षाकडून विविध आमिषे आणि प्रलोभणे दाखवून काही सदस्यांना वेगळा गट स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा गैरप्रकारामुळे लोकशाही मुल्यांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे या गटाला मान्यता देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चर्चा करण्यासाठी आम्हाला वेळ देण्यात यावा अशी विनंतीही करण्यात आलीये.

First published: October 13, 2017, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading