'मनसे'ची पहिली यादी जाहीर, हे आहेत 27 उमेदवार

'मनसे'ची पहिली यादी जाहीर, हे आहेत 27 उमेदवार

विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केल्याने राज ठाकरे यांनी निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला.

  • Share this:

मुंबई 01 ऑक्टोंबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली पहिली यादी जाहीर केलीय. या पहिल्या यादीत 27 उमेदवारांची नावं आहेत. वरळीत आदित्य ठाकरेंविरुद्ध मनसेनं उमेदवार  दिलेला नाही. दादर माहीम मधून नितीन सरदेसाई यांचा पत्ता कापत संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर महपालिकेतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डेला यांना कलिना इथून उमेदवारी देण्यात आलीय. राज ठाकरे हे सुरुवातीला विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केल्याने राज ठाकरे यांनी निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला. EVM विरुद्ध राज ठाकरे यांनी देशव्यापी आंदोलन छेडलं होतं. EVMनेच निवडणूक होणार असेल तर आपण बहिष्कार घालायला पाहिजे असं राज यांचं मत होतं मात्र बहिष्कार घालण्याचा निर्णय हा आम्हाला परवडणारा नाही असं शरद पवार म्हणाले होते. त्यामुळे बहिष्काराचा निर्णय मागे पडला.

हे आहेत मनसेचे उमेदवार

कल्याण ग्रामीण - प्रमोद राजू रतन पाटील

कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर

नाशिक पूर्व - अळोक मुर्तडक

माहिम - संदीप देशपांडे

हडपसर - वसंत मोरे

कोथरूड - किशोर शिंदे

नाशिक मध्य - नितीन भोसले

वणी - राजू उंबरकर

ठाणे- अविनाश जाधव

मागाठाणे - नयन कदम

कसबा पेठ - अजय शिंदे

सिंदखेडा - नरेंद्र धर्मा पाटील

नाशिक पश्चिम - दिलीप दातीर

इगतपुरी - योगेश शेवरे

चेंबूर - कर्णबाळा दुनबळे

कलिना - संजय तुर्डे

शिवाजीनगर - सुहास निम्हण

बेलापूर - गजानन काळे

हिंगणघाट - अतुन वंदिले

तुळजापूर - प्रशांत नवगिरे

दहिसर - राजेश येरूणकर

दिंडोशी - अरुण सुर्वे

कांदिवली पूर्व - हेमंत कांबळे

गोरेगाव - विरेंद्र जाधव

वर्सोवा - संदेश देसाई

घाटकोपर  पश्चिम - गणेश चुक्कल

वांद्रे पूर्व - अखिल चित्रे

भाजपची पहिली यादी: 12 जणांचा पत्ता कट, हे दिग्गज गॅसवर!

VIDEO : सभेत घुसला कुत्रा अन् पवार म्हणाले, 'शिवसेनेची लोकं आली का?'

Published by: Manoj Khandekar
First published: October 1, 2019, 7:14 PM IST

ताज्या बातम्या