Home /News /mumbai /

शिवसेनेवर मात करण्यासाठी राज ठाकरेंची नवी खेळी, पक्षाचा झेंडा बदलणार!

शिवसेनेवर मात करण्यासाठी राज ठाकरेंची नवी खेळी, पक्षाचा झेंडा बदलणार!

Mumbai: MNS Chief Raj Thackeray addresses a press conference regarding Plastic Bag Ban issue, at his residence in Mumbai on Tuesday, June 26, 2018. (PTI Photo) (PTI6_26_2018_000308B)

Mumbai: MNS Chief Raj Thackeray addresses a press conference regarding Plastic Bag Ban issue, at his residence in Mumbai on Tuesday, June 26, 2018. (PTI Photo) (PTI6_26_2018_000308B)

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेनेने हिंदुत्वाबाबात मवाळ भूमिका घेतली असल्याची चर्चा आहे. ती निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मनसे आता नवी भूमिका स्वीकारणार आहे.

  अक्षय कुडकेलवार, मुंबई 05 जानेवारी : राज्यात बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याचा रंग बदलण्याची शक्यता आहे. मनसे पक्षाचा झेंडा बदलण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी झेंड्याचा रंग भगवा किंवा केशरी करणार असल्याची राजकीय चर्चा आहे. झेंड्याचा रंग बदलवण्यावर विचारविनिमय झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्याच्या मनसेच्या झेंड्याचा रंग निळा, भगवा आणि हिरवा आहे, हा रंग बदलून आता संपूर्ण झेंडा भगवा करण्यात येणार आहे. आणि त्यावर राजमुद्राही असेल अशी माहिती सूत्रांनी  दिलीय. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यादिवशी मनसेचं महाअधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाला नवी दिशा देण्यावर कार्यकर्त्यांना उभारी देणार आहे. याच दिवशी आता राज ठाकरे मराठ अस्मितेसोबतच हिंदुत्वाचीही मोट बांधणार आहेत. त्यासाठी झेंड्याचा रंग बदलणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरे आता हिंदुत्वाची वोट बँक तयार करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, वाड्यात भाजपच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळाला होता. त्यामुळे नवीन समिकरण तयार होतेय का याची चर्चाही सुरू झालीय. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेनेने हिंदुत्वाबाबात मवाळ भूमिका घेतली असल्याची चर्चा आहे. ती निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मनसे आता नवी भूमिका स्वीकारणार असल्याची चर्चा असून राज्याच्या राजकारणात नवं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या तुफान भाषणांमुळे मनसे सुवर्णकाळ सुरू झाला. पण 2013 नंतर मात्र मनसेचा पडता काळ सुरू झाला. यानंतर प्रत्येक कार्यक्रमांमधून राज ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करत राहिले पण त्यांची मतांची झोळी रिकामी झाली. अखेर आता पक्षाला पुन्हा उभं करण्यासाठी मसने हिंदुत्वाचीही मोट बांधणार आहे. पण त्यासाठी आता राज ठाकरे कोणता झेंडा हाती घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले... गुढीपाडव्याला नवं सरकार तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचं रखडलेलं खातेवाटप जाहीर झालं. मात्र अनेक नेत्यांची नाराजी अजुन गेलेली नाही. आपल्या मनासारखं खातं मिळालं नसल्यामुळे अनेक नेते नाराज आहेत. त्यातच अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याच्या बातमीमुळेही आघाडी सरकारच्या गोटात खळबळ उडाली होती. याचा फायदा घेत भाजपने सरकारवर हल्लाबोल करायला सुरुवात केलीय. या मतभेदांना चव्हाट्यावर आणून सरकारविरोधात जनमत संघटीत करण्याचं काम भाजपचे नेते करत आहेत. आघाडी सरकार तयार होण्याच्या आधीपासूनच मतभेदांची मालिकाच सुरू झालीय. त्यामुळे एक झाला की दुसरा प्रश्न उभा राहतोय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रत्येक निर्णय घेताना चर्चेत प्रचंड वेळ जातोय. आदेश देऊन काम करायची सवय असलेल्या उद्धव ठाकरेंना याची सवय आता करून घ्यावी लागणार असं राजकीय वर्तुळात बोललं जातय. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

  काँग्रेसचं सत्ताकेंद्र बाळासाहेब थोरातच, चव्हाणांना मागे टाकत ठरले नंबर एक'

  मुनगंटीवार म्हणाले, मतभेदांमुळे हे सरकार गडगडणार आहे. सत्तेतल्या नेत्यांना जनतेशी काहीही देणं घेणं नाही. गुढी पाडवा हे मराठी नव वर्ष असून त्या दिवशी महाराष्ट्रात नवं सरकार येईल असा दावा त्यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार आहे. शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधल्या नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जाण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Raj Thackeray

  पुढील बातम्या