• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Raj Thackeray यांचं नवं घर, पाडव्याच्या मुहूर्तावर सहकुटुंब करणार नव्या घरात गृहप्रवेश

Raj Thackeray यांचं नवं घर, पाडव्याच्या मुहूर्तावर सहकुटुंब करणार नव्या घरात गृहप्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे यावर्षी दिवाळीत शुभकार्य करणार आहेत.

  • Share this:
    मुंबई, 04 नोव्हेंबर: सणासुदीच्या काळात सगळेच जण शुभकार्य करण्याचा प्रयत्न करत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही यावर्षी दिवाळीत शुभकार्य करणार आहेत. हे शुभ कार्य म्हणजे राज ठाकरे आपल्या नव्या घरात (New House) गृहप्रवेश करणार आहेत. दादर येथील कृष्णकुंज हे राज ठाकरे यांचं घर. राज ठाकरे आणि कृष्णकुंज हे समीकरणच वेगळं आहे. दादरमध्ये कृष्णकुंज म्हणजे राज ठाकरे यांचं घर डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र आता राज ठाकरेंची निवासस्थानाची ओळख बदलणार आहे. दिवाळीच्या पाडव्यानिमित्त राज ठाकरे नव्या घरात गृहप्रवेश करणार असल्याचं समजतंय. मात्र राज ठाकरेंनी या घराला अद्याप नाव दिलं नाही आहे. मात्र कृष्णकुंज शेजारीच 5 मजली इमारत हेच राज ठाकरेंचं नवं घर असणार आहे. हेही वाचा- दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाईट बातमी, Pop-Up फटाका खाल्ल्यानं  3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू पाडव्यानिमित्त म्हणजेच उद्याच राज ठाकरे सहकुटुंब या नव्या घरात गृहप्रवेश करतील. त्यासाठी जय्यत तयारी देखील सुरु असल्याचं समजतंय. गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे कृष्णकुंज येथे वास्तव्यास आहेत. राज ठाकरे यांना भेटायचं झाल्यास सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते कृष्णकुंजवर भेटायला येतात. कसं असेल राज ठाकरेंचं नवं घर कृष्णकुंज शेजारीच राज ठाकरेंचं 5 मजली घर असेल. घराच्या पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था केली आहे. तसंच याच इमारतीत कार्यालयही असतील. या इमारतीत पक्षाच्या बैठका, भेटीगाठी आयोजित करण्यात येतील. अन्य मजल्यांवर ठाकरे कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली आहे. हेही वाचा- सुपरस्टार रजनीकांत यांचा Annaatthe रिलीज, फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी उसळली चाहत्यांची गर्दी राज ठाकरेंच्या या नव्या घरात भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आलं आहे. या नव्या घराच्या इमारतीचं काम आता पूर्ण झालं आहे. त्यामुळे उद्या पाडव्यानिमित्त राज ठाकरे कुटुंबीय या घरात प्रवेश करणार असल्याचं समजतंय. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे कोरोनामुक्त 30 ऑक्टोबरला राज ठाकरेंचे कोरोना (Corona Virus Test Report) चाचणी रिपोर्ट आले त्या रिपोर्टनुसार, राज ठाकरे कोरोनामुक्त झाल्याचं समजलं. राज ठाकरेंची 29 ऑक्टोबरला चाचणी करण्यात आली. या चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतर ते कोरोनामुक्त झाल्याचं समजलं. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री कुंदाताई, बहिण देखील कोरोना मुक्त झाल्या आहेत. हेही वाचा- पिंपरीत दृश्यम स्टाईलनं हत्या, अनैतिक संबंध समजताच पत्नीच्या Boyfriend ला संपवलं 23 ऑक्टोबर रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी कोरोनाने शिरकाव केला. राज ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Raj Thackeray corona test positive) आला होता. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या आई आणि बहिणींनाही कोरोनाची लागण झाली होती. सर्वांवर लिलावती हॉस्पिटलच्या (Lilavati Hospital) डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्यात आले.
    Published by:Pooja Vichare
    First published: