मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Raj Thackeray : बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याला सलाम करणारं राज ठाकरे यांचं अनोखं व्यंगचित्र

Raj Thackeray : बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याला सलाम करणारं राज ठाकरे यांचं अनोखं व्यंगचित्र

राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या व्यंगचित्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यातील संभाषण दाखवण्यात आलं आहे.

राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या व्यंगचित्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यातील संभाषण दाखवण्यात आलं आहे.

राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या व्यंगचित्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यातील संभाषण दाखवण्यात आलं आहे.

  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 16 नोव्हेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना श्रद्धांजली अर्पण करणारं आणि त्याच्या कार्याला सलाम करणारं एक अनोखं व्यंगचित्र (Cartoon) शेअर केलंय. बाबासाहेब पुरंदरे यांनी संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचं कार्य घराघरात पोहोचवण्यासाठी व्यतीत केलं. त्यांनी शिवचरित्राशी संबंधित अनेक नाटकं, पोवाडे लिहिले. व्याख्याने दिली, संशोधन केलं, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या या कार्याला सलाम करणारं एक व्यंगचित्र राज ठाकरे यांनी शेअर केलंय.

राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात नेमकं काय?

राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या व्यंगचित्रात शिवाजी महाराज आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यातील संभाषण दाखवण्यात आलं आहे. "ये रे माझ्या गड्या, मला शोधण्यासाठी जगभर खूप पायपीट केलीस, अविश्रांती मेहनत घेतलीस, माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलंस ! ये, आता जरा आराम कर !", असं शिवाजी महाराज बाबासाहेबांना उद्देशून बोलत असल्याचं व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे.

बाबासाहेबर पुरंदरे यांचं सोमवारी (15 नोव्हेंबर) सकाळी पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. ते 99 वर्षांचे होते. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा जगभरात प्रचार व्हावा यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

हेही वाचा : 'मला जमिनीवर उतरवणारी..'असं म्हणत समीर चौगुलेंची पत्नीसाठी खास पोस्ट

बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे यांच्यातील नातं सर्वश्रूत असं आहे. बाबासाहेबांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर राज ठाकरे पुण्यात त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनासाठी गेले होते. राज यांना बाबासाहेबांच्या निधनाने खूप दु:ख झालंय. त्यांनी कालदेखील बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करणारं ट्विट केलं होतं. शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला, असं राज ठाकरे काल ट्विटरवर म्हणाले होते. "बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायम मार्गदर्शन होत आलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, परंतु मला पितृतुल्यही होते", असंदेखील राज म्हणाले होते.

First published:

Tags: MNS, Raj Thackeray