Home /News /mumbai /

...तर कोरोना रुग्ण आणखी वाढतील, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर असं का म्हणाले राज ठाकरे?

...तर कोरोना रुग्ण आणखी वाढतील, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर असं का म्हणाले राज ठाकरे?

संकाटाच्या वेळी परराज्यातील लोक आधी पळतील, असं आपण आधीच भाषणात म्हटलं होतं, याचीही आठवण राज यांनी यावेळी करुन दिली.

    मुंबई, 7 मे: राज्यात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. या प्रार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेला कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांचे सहकार्य महत्वाचं असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज यांनी लॉकडाऊनच्या काळात सरकारनं घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्याचबरोबर सरकारला सल्लाही दिला आहे. हेही वाचा.. मास्क न घालताच मंत्रालयात पोहोचलेल्या राज ठाकरे यांनी दिली विचित्र प्रतिक्रिया लॉकडाऊनबाबत काय आहे सरकारचा एक्झिट प्लान? लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लान काय आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर काय, राज्यातील लॉकडाऊन सरकार कशा पद्धतीने उठवणार आहे, हे सरकारने अद्याप स्पष्ट केलं नाही. सरकारने याबाबत 10 ते 15 दिवस आधी जनतेला सांगायला हवं. तसेच येत्या 25 तारखेला ईद आहे. याकाळात लॉकडाऊन नसला तर लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतील, त्यामुळे कोरोना रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत वाढतील, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर परप्रांतीयांकडून पैसे न घेण्याच्या मागणीबाबत माणुसकी बाजूला ठेवली पाहिजे, असा सल्ला राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. संकाटाच्या वेळी परराज्यातील लोक आधी पळतील, असं आपण आधीच भाषणात म्हटलं होतं, याचीही आठवण राज यांनी यावेळी करुन दिली. जे कामगार गेले आहेत त्यांच्याऐवजी महाराष्ट्रातील तरुणतरुणींना नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध करून द्यावा. त्याचप्रमाणे, शाळा सुरू कशा करणार? ही माहिती पालकांपर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे. हेही वाचा.. ...आणि अजितदादा आणि फडणवीस आले एकत्र, पाहा हे PHOTOS आणखी काय म्हणाले राज ठाकरे? -परप्रांतीय कामगारांची परत तपासणी केल्यशिवाय महाराष्ट्रात घेऊ नये. -राज्य स्थलांतरित कायद्याखाली सरकारने राज्याबाहेरील कामगारांची नोंदणी करावी - जे कामगार गेले आहेत त्या ऐवजी महाराष्ट्रातील तरुण तरुणींना नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध करून द्या. -महापालिका, सरकारी कर्मचारी पोलिस, सफाई कर्मचारी यांच्याकडे लक्ष देणे गरजेच आहे. - शेतकरीबाबत, कर्जाच्या परत फेडीबाबत प्रश्नांना सरकार उत्तर देईल. - आपल्याकडे पहिल्यापासून सगळ्या गोष्टींचा मेस झाला. कोणत्याही गोष्टीचा ताळमेळ नाही. -बाहेरच्या राज्यातील लोक सरकारी रुग्णालयात आणि इथली लोक खासगी रुग्णालयात. -या सगळ्या सूचना सरकारने गांभीर्याने घ्यावी. -जगातल्या आकड्यांपेक्षा भारताचा आकडा कमी - जगात माणुसकीचा विचार नाही करत यंत्रणेचा विचार करतात -या आधी मी भाषणात म्हटलं होतं की संकाटाच्या वेळी परराज्यातील लोक पहिले पळतील. -खच्चीकरण होणार नाही अशी गोष्ट करू - अशी परिस्थिती, शांत रस्ते कधी पाहिले नव्हते -ज्याप्रकारे सरकार काम करतंय, चुका त्रुटी असतीलही दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी व्हिडीयो काँनफरसिंग द्वारे चर्चा सुरू झाली. कोविड 19 चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांचं सहकार्य महत्वाचं असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी सांगितलं. यामध्ये प्रामुख्याने विरोधी पक्ष नते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच माकप, भाकप, एमआयएम आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांचाही या चर्चेत सहभागी झाले होते. राज्य सरकारकडून या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे देखील सहभागी होणार आहेत.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या