राज ठाकरे पुन्हा खळ्ळ खट्याकच्या भूमिकेत? टोलवरून होणार संघर्ष

राज ठाकरे पुन्हा खळ्ळ खट्याकच्या भूमिकेत? टोलवरून होणार संघर्ष

पुण्यातील काही संघटना आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दादर इथल्या निवास्थानी आले होते.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेलं टोल प्लाझा आंदोलन काही प्रमाणात यशस्वी झालं होतं. या आंदोलनाची तीव्रता इतकी मोठी होती राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट संपलेले तब्बल 65 टोलनाके बंद केले. यापैकीच एका आंदोलनासाठी राज ठाकरे यांना काही दिवसांपूर्वीच बेलापूर इथल्या कोर्टात हजर राहावे लागले होते. आता पुन्हा टोल बंद करावे या मागणीसाठी पुण्यातील काही संघटना आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दादर इथल्या निवास्थानी आले होते.

या सर्वपक्षीय शिष्टमंडळात काँग्रेस, शिवसेना. राष्ट्रवादी या पक्षाच्या प्रतिनिधींचाही समावेश होता. मुंबई-पुणे जुन्या हायवेवर तळेगावच्या जवळ असलेल्या सोमाटणे हा टोलनाका बंद करण्यात यावा ,अशी मागणी या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली होती. गेली 15 वर्ष हा टोलनाका बंद व्हावा म्हणून स्थानिक मागणी करत होते. परंतु अकरा वर्षासाठी असलेलं कंत्राट आधीच देण्यात आलं आहे, त्यामुळे दिलेले कंत्राट मागे घेता येणार नाही अशी भूमिका सरकार घेत होते. आता मात्र कोरोना कालावधीत सुद्ध टेंडर देऊन टोल वसूल करण्याचा अधिकार देण्यात आलेले आहे.

स्थानिक नागरिकांचा या टोलवसुलीला तीव्र निषेध असून शासनाने ताबडतोब ही टोल वसुली बंद करावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी राज ठाकरे यांनी आयआरबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्याशी फोनवरून चर्चा करून उद्या या यासंदर्भातला अहवाल देण्यास सांगितलं आहे. 21 फेब्रुवारीपर्यंत शासनाने कुठलेही पाऊल उचलले नाही तर मोठे आंदोलन सोमाटणे टोल प्लाझावर केले जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

हेही वाचा - धक्कादायक! मुंबईत 4 जण विलगीकरणातून पळाले, गुन्हा नोंद करण्याचे महापौरांचे आदेश

राज्य शासन आपणच काढलेल्या नियमांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. दोन टोल नाके यामधील अंतर हे किमान साठ किलोमीटर असावं, असा नियम असताना सुद्धा सोमाटणे भागातील लोकांना केवळ तीस किलोमीटरसाठी टोल भरावा लागत आहे. त्यामुळे 21 तारखेला सर्व पक्षीय आंदोलनाला मनसेचा पाठिंबा असेल असं आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आलेल्या गावकर्‍यांना दिलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: February 17, 2021, 11:37 PM IST

ताज्या बातम्या