संजय निरुपम यांच्या घराबाहेर मनसेचा असभ्य भाषेतला फलक

संजय निरुपम यांच्या घराबाहेर मनसेचा असभ्य भाषेतला फलक

काल काँग्रेस कार्यालय फोडल्यावर मनसेनं निरुपम यांच्या घराबाहेर एक पोस्टर लावलंय. त्यात निरुपम यांचा उल्लेख परप्रांतीय भटका कुत्रा असा करण्यात आलाय.

  • Share this:

02 डिसेंबर : मनसे विरुद्ध संजय निरूपम हा वाद काही संपायचं नाव घेत नाहीये. काल काँग्रेस कार्यालय फोडल्यावर मनसेनं निरुपम यांच्या घराबाहेर एक पोस्टर लावलंय. त्यात निरुपम यांचा उल्लेख परप्रांतीय भटका कुत्रा असा करण्यात आलाय. संजय निरूपमांच्या लोखंडवालामधील घराबाहेर मनसे नेते अखिल चित्रे हे पोस्टर लावलं.

राजकीय विरोध जरी ठीक असला, तरी विरोधकांना कुत्रा म्हणणं कितपत योग्य आहे याचा विचार मनसेनं करावा, अशी भावना नागरिक व्यक्त करतायेत.

त्याचप्रमाणे काँग्रेसच्या वांद्रे खेरवाडीमधील संपर्क कार्यालयावर रात्री अज्ञातांकडून शाईफेक करण्यात आली असून काही प्रमाणात तोडफोडही करण्यात आली आहे.

मुंबईतल्या काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. चौकशीअंती आठही जणांना अटक करण्यात आलीये.

First published: December 2, 2017, 9:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading