मनसेच्या फेरीवाल्याविरोधी आंदोलनामुळे भाजीपाला विक्री मंदावली

मनसेच्या फेरीवाल्याविरोधी आंदोलनामुळे भाजीपाला विक्री मंदावली

मुंबई आणि ठाण्यातील फेरीवाल्यावर महापालिकेकडूनही होत असलेल्या कारवाईमुळे राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या शेतमालावर 50 टक्के परिणाम झालाय.

  • Share this:

01 डिसेंबर : मुंबई-ठाण्यातील मनसेच्या फेरीवाला विरोधी आंदोलनाची झळ आता राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचलीये. मुंबई आणि ठाण्यातील फेरीवाल्यावर महापालिकेकडूनही होत असलेल्या कारवाईमुळे राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या शेतमालावर 50 टक्के परिणाम झालाय.

मुंबईतला फेरीवाल्याचा प्रश्न अजून संपत नसल्याने मुंबईतील भाजी विक्रेत्यांनी एपीएमसीकडे पाठ फिरवलीये. दररोज नवी मुंबईच्या एपीएमसीच्या बाजार पेठेत मुंबई आणि ठाण्यासाठी शेतकऱ्याच्या 500 ते 550 शेतमालाच्या गाड्याची आवक होते. ही आवक ही आता 30 ते 35 टक्क्यांनी घटलीये. यामुळे भाजीपाल्याचे भाव ही 35 ते 40 टक्क्यांनी घसरले आहे.

मटार, वांगी, कोभी फ्लॉवर सारख्या भाज्यांचे दर 50 टक्क्यांहून ही खाली कोसळलेत. तर सर्वांत जास्त फटका हा पालेभाज्यांचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसलाय. पालेभाज्या या नाशवंत असल्याने अशा या पालेभाज्यांना उठाव नसल्याने एकतर कवडीमोल भावाने विकाव लागतंय.  अन्यथा एपीएमसी मध्येच फेकाव लागतंय. शेतमाल काढून मुंबईत पाठवायचं म्हटलं तर मजुरी ही सुटतं नाही. यापेक्षा मजुरीचा भुर्दंड पडू नये म्हणून शेतकरी शेतातच शेतमाल सडून दिला जातोय. अशा दोन्ही बाजूने शेतकरी कैचीत सापडलंय.

नवी मुंबई एपीएमसीत आवक घटली

कोथिंबीर -  10 रु. जुडी

पालक -  5 रु. जुडी

मेथी - 8 रु. जुडी

शेपू - 10 रु. जुडी

फ्लॉवर - 8 रु. किलो

कोबी - 16  रु. किलो

दुधी - 10 रु. किलो

मटार - 30 रु. किलो

गवार - 26 रु. किलो

कारली - 28 रु. किलो

वांगी - 12 रु. किलो

तोंडली - 24 रु. किलो

सिमला मिरची - 28 रु. किलो

भेंडी - 30 रु. किलो

First published: December 1, 2017, 5:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading