केडीएमटी बसच्या दुरावस्थेविरोधात मनसेची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

केडीएमटी बसच्या दुरावस्थेविरोधात मनसेची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन अर्थात केडीएमटीच्या वाजलेल्या बोऱ्या आणि वापरात नसणाऱ्या नवीन बसेसच्या दुरावस्थेविरोधात मनसेने आज अभिनव आंदोलन केलं. केडीएमटीच्या बसची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून ती बस परिवहन अधिकाऱ्यांना भेट दिली.

  • Share this:

18 मे : कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन अर्थात केडीएमटीच्या वाजलेल्या बोऱ्या आणि वापरात नसणाऱ्या नवीन बसेसच्या दुरावस्थेविरोधात मनसेने आज अभिनव आंदोलन केलं. केडीएमटीच्या बसची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून ती बस परिवहन अधिकाऱ्यांना भेट दिली.

कल्याण पूर्वेतील नेतीवली परिसरातील  मॉलशेजारी केडीएमटीची जागा असून त्याठिकाणी अनेक नव्या बस गेल्या कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडल्या आहेत. जेएनएनयुआरएमअंतर्गत 60 नव्या कोऱ्या करकरीत बस २ वर्षांपूर्वी केडीएमटीच्या ताफ्यात दाखल झाल्या. कल्याण डोंबिवली महापालिकेनं मोठ्या गाजावाजा करून या बसेस आल्याचा धिंडोरा पिटला होता. मात्र, आल्यापासून या सर्व नवीन बस आहे तिथेच धूळ खात उभ्या आहेत. गेल्या २ वर्षांत या बसेसपैकी अनेक बसचे टायर गायब आहेत, तर काही इंजिनचे पार्ट गायब आहेत. याहून धक्कादायक म्हणजे याठिकाणी असणाऱ्या काही बसेसचा वापर चक्क अंघोळ करण्यासाठी केला जातो. या बस वापरात काढण्यासाठी आम्ही प्रशासनाला अनेक वेळा अर्ज दिले, विनंत्या केल्या. परंतू त्यांना केराची टोपली दाखवण्यात आल्याची माहिती मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिली.

दरम्यान या आंदोलनानंतरही महापालिकेने या बसेस वापरात काढल्या नाही तर महापालिका मुख्यालयात यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

First Published: May 18, 2017 10:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading