मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'सौदीमध्ये जे होऊ शकतं, मग भारतात...', मोदींचं नाव घेत काय म्हणाले राज ठाकरे?

'सौदीमध्ये जे होऊ शकतं, मग भारतात...', मोदींचं नाव घेत काय म्हणाले राज ठाकरे?

मोदींचं नाव घेत काय म्हणाले राज ठाकरे?

मोदींचं नाव घेत काय म्हणाले राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा विषय हाती घेणार असल्याचे संकेत त्यांनी आजच्या प्रगट मुलाखतीत दिले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 मार्च : सौदी अरेबियात भोंगे बंद होऊ शकतात तर आपल्याकडे पंतप्रधान मोदी पोंगे बंद का करू शकत नाहीत? असा प्रश्न करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपले इरादे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहेत. लोकमान्य सेवा संघ पारले यांच्या शतकपूर्ती सोहळ्या निमित्त 'कलासक्त मनाचे कवडसे' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांची स्वतः ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी विशेष मुलाखत घेतली. यावेळी पाडवा मेळाव्यात काय ऐकायला मिळणार याची झलक या मुलाखतीत पाहायला मिळाली.

काय म्हणाले राज ठाकरे?

काही दिवसांपूर्वीच मनसेने पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा हात घेणार असल्याचे संकेत दिले होते. आता तर खुद्ध मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीच यावर भाष्य केलं आहे. सौदीमध्ये भोंगे बंद होऊ शकतात तर आपल्याकडे पंतप्रधान मोदी पोंगे बंद करू का शकत नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उद्या सभा आहे, त्यात मी बोलेनच. त्यामध्ये कदाचित अजून काहीतरी जास्ती येईल, असं सांगत एकप्रकारे उद्याच्या सभेत काय असेल याची झलकच राज ठाकरे यांनी दिली आहे.

वाचा - चिमुकल्यांच्या शालेय पोषण आहारात चक्क प्लास्टिकचा तांदूळ! सोलापूर जिल्ह्यात खळबळ

मी एका अत्यंत कडवट हिंदुत्ववादी घराण्यात जन्माला आलो आहे. हळूहळू हिंदुत्ववादी होणे म्हणजे काय असते? माझा आधीचा झेंडा वेगळा होता. पण आता जो झेंडा आहे तोच माझ्या मनात आधीपासून होता. रजा अकादमी विरोधात मोर्चा काढणारा माझाच पक्ष होता. पाकिस्तानी कलाकारांना हाकलून देणारा माझाच पक्ष होता. तुम्ही जावेद अख्तर यांचे पाकिस्तान मधील वक्तव्य ऐकणे गरजेचे आहे. तुम्ही आमच्या लता मंगेशकर यांना मानत नाहीत तर आम्ही का तुमच्या कलाकारांना मानू. या देशात इतकं टॅलेंट भरलेले आहे तर ती पाकिस्तानी नरडी आपल्याला हवेत कशाला? जे हिंदुत्व हिंदुत्व बोलतात त्यांनी मला एकदा त्यांचे हिंदुत्व सांगावे, असे स्पष्ट

 सौदीने मशिदींच्या भोंग्यावर घातली बंदी!

मशिदींवरच्या भोंग्यांच्या प्रकरणामुळे मागच्या वर्षी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. मशिदींवरचे भोंगे बंद करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, यानंतर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. आता इस्लामिक राष्ट्र असलेल्या सौदी अरेबियामध्येही मशिदीवरचे भोंगे काढण्याचे आदेश तिथल्या सरकारने दिले आहेत. मुस्लिम समाजासाठी सगळ्यात पवित्र असलेल्या रमझानला 22 मार्चपासून सुरूवात होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने काही कठोर नियम केले आहेत, ज्यामध्ये मशिदींवरची भोंगाबंदीही आहे.

First published:
top videos

    Tags: MNS, Raj Thackeray