मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आता मनसेचंही 'जय श्रीराम', राज ठाकरेंनी केलं नरेंद्र मोदींचं अभिनंदन

आता मनसेचंही 'जय श्रीराम', राज ठाकरेंनी केलं नरेंद्र मोदींचं अभिनंदन

संक्रांतीला मोदी फक्त पतंग नाही तर त्यासोबत थापा उडवत आहेत, अशा आशयाचं व्यंगचित्र राज ठाकरे यांनी रेखाटलं आहे.

संक्रांतीला मोदी फक्त पतंग नाही तर त्यासोबत थापा उडवत आहेत, अशा आशयाचं व्यंगचित्र राज ठाकरे यांनी रेखाटलं आहे.

आत्तापर्यंत राज ठाकरे कुठल्याही विषयावर लगेच प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हते. राम मंदिराच्या प्रश्नावर मात्र त्यांनी लगेच प्रतिक्रिया दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

  • Published by:  Ajay Kautikwar

मुंबई 5 फेब्रुवारी : मनसेच्या बदलत्या भूमिकेनंतर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत आहे. अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली. अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार एका ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट असं त्या ट्रस्टचं नाव असून सर्व 67 एकर जमीन या ट्रस्टला दिली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचं राज ठाकरे यांनी तत्काळ स्वागत केलंय. यामुळे राज्यात बदलत्या राजकीय समिकरणाची नांदी झाली असल्याचं बोललं जातंय.

त्याचबरोबर मशिद बांधण्यासाठी सुन्न वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्यासाठी कार्यवाही सुरु झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराचा तास सुरु होण्यापूर्वी पंतप्रधानांनी हे निवेदन केलं. पंतप्रधान म्हणाले, राम हा देशातल्या प्रत्येकाच्या मनात आणि कणाकणात आहे. रामजन्मभुमीवर भगवान रामांचं भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे.

पंतप्रधान पुढे म्हणाले, अयोध्येचा निकाल आल्यानंतर देशाविसायांनी अतिशय प्रगल्भतेचं दर्शन घडवलं होतं. त्यामुळे सगळ्या देशवासियांना मी धन्यवाद देतो. देशातल्या सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाण्याचं माझ्या सरकारचं धोरण आहे. त्यानुसार सरकारची वाटचाल सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

CAAवरून काँग्रेसच्या या दिग्गज मंत्र्याचं CM ठाकरेंनाच आव्हान

मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी पक्षाचं पुढचं धोरण हे हिंदुत्वाकडे झुकलेलं असेल असं स्पष्ट केलं होतं. तेव्हापासूनच भाजप आणि मनसे एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली होती. राज ठाकरेंच्या या ट्वीट नंतर पुन्हा या चर्चेला वेग आलाय. आत्तापर्यंत राज ठाकरे कुठल्याही विषयावर लगेच प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हते. राम मंदिराच्या प्रश्नावर मात्र त्यांनी लगेच प्रतिक्रिया दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

काय म्हणाले राज ठाकरे?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली.

ह्या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा. ह्या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन. असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

First published:

Tags: Narendra modi, Raj Thackeray