S M L

मुंबईत मातोश्रीबाहेरच मनसेची 'पोस्टरबाजी'

बीएमसी महापौरपदाच्या सत्तासंघर्षात भाजपची जिरवण्यासाठी शिवसेनेनं मनसेचे 6 नगरसेवक फोडल्यानं ठाकरेबंधू पुन्हा आमनेसामने आलेत. या राजकीय फोडाफोडीवरून मनसैनिकांनी शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी सुरू केलीय.

Chandrakant Funde | Updated On: Oct 15, 2017 09:17 PM IST

मुंबईत मातोश्रीबाहेरच मनसेची 'पोस्टरबाजी'

मुंबई. 15 ऑक्टोबर : बीएमसी महापौरपदाच्या सत्तासंघर्षात भाजपची जिरवण्यासाठी शिवसेनेनं मनसेचे 6 नगरसेवक फोडल्यानं ठाकरेबंधू पुन्हा आमनेसामने आलेत. या राजकीय फोडाफोडीवरून मनसैनिकांनी शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी सुरू केलीय. आज सकाळी दादरच्या शिवसेना भवनाबाहेर लावलेलं पोस्टर मनपा आणि पोलिसांनी काढताच मनसेनं आता थेट मातोश्रीच्या दारात पोस्टरबाजी सुरू केलीय.

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर हे पोस्टर लावण्यात आलंय. शिवसेनेला आता गालावर टाळी देणार, अशी भाषा राज ठाकरेंनी वापरल्यानंतर रस्त्यावरच्या संघर्षाला होणार याची स्पष्ट चिन्ह दिसताहेत. आणि म्हणूनच मातोश्रीच्या अंगणात जाऊन पोस्टर लावण्याची हिम्मत मनसैनिकांनी केलीय. या पोस्टरवर 'नीच राजकारण जनता विसरणार नाही, ' हे राज ठाकरेंनी आजच्या पत्रकार परिषदेत वापरलेला डॉयलॉग वापरण्यात आलाय. तसंच पोस्टरवरचा राज ठाकरेंचा फोटोही मातोश्रीकडे बघताना डोळ्यातून आग ओकणारा वापरण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 15, 2017 07:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close