वाहतूक पोलिसावर हात उचलणाऱ्या तरूणाला मनसे कार्यकर्त्यांचा चोप, व्हिडिओ व्हायरल

वाहतूक पोलिसावर हात उचलणाऱ्या तरूणाला मनसे कार्यकर्त्यांचा चोप, व्हिडिओ व्हायरल

परेलमध्ये एका तरूणानं वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्यावर हात उगारला होता. ही घटना कळताच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्या तरूणाला चोप देत पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं.

  • Share this:

05 नोव्हेंबर : पोलिसांवर हात उगारणाऱ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला असा उल्लेख राज ठाकरेंनी कालच्या भाषणात केला होता. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल झालाय.

परेलमध्ये एका तरूणानं वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्यावर हात उगारला होता. ही घटना कळताच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्या तरूणाला चोप देत पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं. राज यांनी या घटनेचा उल्लेख करत पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नये, असंही सुचवलं होतं. त्या भाषणानंतर हा व्हिडीओ आता व्हायरल झालाय.

First published: November 5, 2017, 12:54 PM IST

ताज्या बातम्या