मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मनसेच्या पदाधिकाऱ्यांनं फोडलं प्रांताधिकाऱ्यांच शासकीय वाहन, पाहा LIVE VIDEO

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनं फोडलं प्रांताधिकाऱ्यांच शासकीय वाहन, पाहा LIVE VIDEO

उपविभागीय कार्यालयात गाडी उभी असताना काचेवर घातला पेव्हर ब्लॉक

उपविभागीय कार्यालयात गाडी उभी असताना काचेवर घातला पेव्हर ब्लॉक

उपविभागीय कार्यालयात गाडी उभी असताना काचेवर घातला पेव्हर ब्लॉक

उल्हासनगर, 24 नोव्हेंबर: उल्हासनगर (Ulhasnagar) मनसेचे (MNS) विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख  (Yogiraj Deshmukh) यांनी उपविभागीय दंडाधिकारी जगतसिंग गिरासे ( Government Officer Jagatsing Girase) यांची शासकीय वाहन (Government vehicles) फोडलं. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. गाडी फोडतांचा मोबाईलमध्ये कैद झालेला व्हिडिओ (Live Video) देखील समोर आला आहे.

उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयात ही गाडी उभी असताना पेव्हर ब्लॉक आणि दगड टाकून गाडीची तोडफोड केली आहे.

हेही वाचा...धक्कादायक! संतापलेल्या शेतकऱ्यांनं शासकीय कार्यालयातच स्वत: ला घेतलं पेटवून

कॅम्प एक आणि दोन याठिकाणी शासकीय मोकळे भूखंड असून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होत आहेत. त्या संदर्भात वारंवार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी गिरासे यांना भेट देत माहिती दिली. असताना त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. शिवाय आज त्यांना कार्यलयात भेटायला गेलो असता त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना भेटू न दिल्याने हे कृत्य केल्याचे देशमुख याने सांगितले. तर या प्रकरणी गाडीचा चालक फिर्याद देणार असल्याचे उपविभागीय अधिकारी गिरासे यांनी सांगितलं आहे. पोलिस घटनस्थळी दाखल झाले असून देशमुख यांच्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात वर्दीवर असलेल्या पोलिसांवर तलवारीने प्राणघातक हल्ला झाला होता. गाडी अडवल्याच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार करण्यात आल्याची घटना 23 ऑक्टोबरला घडली होती. अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर हा सगळा प्रकार घडला होता. घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात सर्व आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

बाळू चव्हाण असं या घटनेत जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव असून ते उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. चव्हाण हे शुक्रवारी रात्री ड्युटी संपवून उल्हासनगरहून बदलापूरला आपल्या घरी जायला निघाले होते. त्यावेळी अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या बाहेर वाहतूक कोंडी झाली असताना एका कारमध्ये चार रेकॉर्डवरील गुन्हेगार रक्ताने माखलेल्या अवस्थेत बसलेले त्यांना आढळले. त्यामुळे त्यांनी या चौघांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता या चौघांनी गाडीतून उतरून त्यांच्या डोक्यात तलवारीने वार केले. यानंतर कारच्या मागे असलेल्या एका रिक्षाचालकाला तलवारीचा धाक दाखवत त्याची रिक्षा घेऊन हे चौघे पसार झाले.

हेही वाचा..लग्न झालेल्या प्रेयसीला भेटायला बोलवून चेहऱ्यावर फेकलं अॅसिड, पुण्यातील थरार

या आरोपींनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गाडी फोडली, तिथून एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर त्यांनी हल्ला केला. तिथून उल्हासनगरच्या शिवाजी चौकात एक लाल रंगाच्या आय ट्वेन्टी गाडीची काच फोडत चालकाचं अपहरण करून ते अंबरनाथला आले. आणि त्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचारी बाळू चव्हाण यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासाच्या आत उल्हासनगरमधून बेड्या ठोकल्या. या आरोपींवर आत्तापर्यंत आतापर्यंत सहा ते सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून धारदार शस्त्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

First published:
top videos

    Tags: MNS, Mumbai, Raj raj thackeray