S M L

वंदे मातरमची मनसेकडून खिल्ली तर संजय राऊत यांचं वादग्रस्त विधान

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्याच्या निर्णयाला मनसेनं विरोध केलाय. तर जे विरोध करत आहेत त्यांची डीएनए करावी लागेल, असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.

Sonali Deshpande | Updated On: Aug 11, 2017 10:15 AM IST

वंदे मातरमची मनसेकडून खिल्ली तर संजय राऊत यांचं वादग्रस्त विधान

11 आॅगस्ट : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्याच्या निर्णयाला मनसेनं विरोध केलाय. मनसेनं खिल्ली उडवलीये. विद्यार्थ्यांचे टॅब बंद आहेत तरी वंदे मातरम, शालेय वस्तू घोटाळा होतो तरी वंदे मातरम,शाळांचे छप्पर गळतायत तरी वंदे मातरम,असं ट्विट करुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या निर्णयाची खिल्ली उडवलीये.

Loading...

समाजवादी पार्टीचे नगरसेवक वगळता सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. सपाच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध करत सभात्याग केला, तर जे विरोध करत आहेत त्यांची डीएनए करावी लागेल, असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 10:15 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close