राज यांच्या 'मनसे'तील गटबाजी चव्हाट्यावर, 'कृष्णकुंज'वरच भिडले मनसैनिक

राज यांच्या 'मनसे'तील गटबाजी चव्हाट्यावर, 'कृष्णकुंज'वरच भिडले मनसैनिक

राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

  • Share this:

मुंबई,14 डिसेंबर: राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि नेते अभिजीत पानसे यांच्या मनमानीला कंटाळून गजानन काळे यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. आगामी काही महिन्यांत नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे गजानन काळे यांचा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गजानन काळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला.

'कृष्णकुंज'वरच मनसैनिक आमनेसामने..

गजानन काळे यांनी ट्वीट करत राजीनामा देण्यामागील कारण सांगितले. त्यांनी ट्वीट केले की, अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा देत आहे. काळे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे आमदार राजू पाटील आणि गजानन काळे यांसोबत बैठक घेतली. दरम्यान यावेळी कृष्णकुंजवर गजानन काळे आणि अविनाश जाधव यांचे समर्थक आमनेसामने आले. त्यामुळे कृष्णकुंजवर काही काळ तणावाचे वातावरण होते. समजला जात आहे.

पत्र लिहून व्यक्त केली नाराजी..

गजानन काळे यांनी राज यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. नवी मुंबईत मनसे पक्षवाढीसाठी खूप प्रयत्न केले. दोन-तीन निवडणुका न लढतासुद्धा विधानसभा निवडणुकीत 50 हजार मतदारांचा विश्वास संपादित करु शकलो. पण काही पदाधिकाऱ्यांनी मनसेची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर काही जणांनी अमित ठाकरे यांच्या थाळीनाद मोर्चाच्या एक दिवस आधीच राजीनामे दिले. त्यामुळे अमित ठाकरे यांचा मोर्चा अयशस्वी व्हावा, यासाठीच त्यांनी राजीनामा दिला का? अशी शंका उपस्थित होते.

Published by: Sandip Parolekar
First published: December 14, 2019, 9:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading