मुंबई, 08 सप्टेंबर: मनसेचे (MNS) नवी मुंबई (Navi Mumbai) शहर अध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांच्या अटकपूर्व जामीनावरील (Anticipatory Bail) सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली. आज यावर निकाल जाहीर होणार आहे. काल सुनावणी पूर्ण झाली असली तरी न्यायमूर्तीनी निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आज निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
पत्नीचा मानसिक आणि शारिरीक छळ, मारहाण आणि परस्त्रीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या तक्रारीवरून गजानन काळे यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. यावर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर मंगळवारी सुनावणी पूर्ण झाली. मात्र न्यायमूर्ती रेवती मोहिते- डेरे यांनी निकाल राखून ठेवला आहे.
तसंच गजानन काळे यांना तूर्तास अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टानं कायम ठेवले आहेत. त्यामुळे काळे यांना तूर्तास का होईना दिलासा मिळाला आहे. काळे यांनी हायकोर्टात सांगितलं, माझ्या विरोधात केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत.
Breaking News: इंडोनेशियाच्या तुरुंगात अग्नीतांडव, 40 कैद्यांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी गजानन काळे यांच्या पत्नीनं त्यांच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी मानसिक आणि मानसिक आणि शारिरीक छळ, मारहाण आणि परस्त्रीबरोबर अनैतिक संबंध , जातीवाचक शिवीगाळ असे आरोप लावले होते. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी मानसिक आणि शारिरीक छळ करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली काळेंवर गुन्हा दाखल केला.
या तक्रारीनंतर अटकेची शक्यता असल्यानं त्यांनी प्रथम ठाणे सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्या निकालाविरोधात काळेंनी हायकोर्टात धाव घेतली आणि त्या निकालाला आव्हान देत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.