काशिनाथ घाणेकरला प्राईम टाईम शो द्या नाहीतर..., मनसे पुन्हा आक्रमक

काशिनाथ घाणेकरला प्राईम टाईम शो द्या नाहीतर..., मनसे पुन्हा आक्रमक

जर घाणेकर सिनेमाला प्राईम टाईम शो नाही मिळाला तर आम्ही मल्टिप्लेक्स फोडून टाकू असा धमकीवजा इशारा मनसेने दिला आहे.

  • Share this:

मुंबई, १० नोव्हेबर : मुंबईत पुन्हा एकदा मराठी सिनेमांवरून मनसेचा दणका पाहायला मिळाला आहे. मल्टिप्लेक्स चालकांविरोधात मनसेने पुन्हा आक्रमक झाली आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर या मराठी सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्राईम टाईम शो मिळवा यासाठी मनसेने कल्याणमध्ये हे आंदोलन केलं आहे.

जर घाणेकर सिनेमाला प्राईम टाईम शो नाही मिळाला तर आम्ही मल्टिप्लेक्स फोडून टाकू असा धमकीवजा इशारा मनसेने दिला आहे. मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी हा इशारा दिला आहे.

गेल्या शुकरवारी बॉक्स ऑफिसवर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा हिंदी सिनेमा आणि 'डॉ. काशिनाथ घाणेकर' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण त्यानंतर चर्चा फक्त 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमाची. तसं या दोन्ही सिनेमांच्या रिव्हू बद्दल बोलायचं झालं तर डॉ. काशिनाथ घाणेकर या सिनेमाला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली आहे.

पण असं असताना देखील काशिनाथ घाणेकर सिनेमासाठी बॉक्स ऑफिवर जास्त शो नसल्याने प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्यांवर पुढाकार घेत मनसेने आता कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

मराठी सिनेमांबद्दल मनसेनं अनेकवेळा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात थिएटरमध्ये खाद्य पदार्थ विक्रिवरही मनसेनं अनेक वेळा आंदोलन केली आहे. त्यामुळे मनसेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे डॉ. काशीनाथ घाणेकर या सिनेमाला न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ठग्स ऑफ हिंदोस्तान चित्रपटाची प्रसिद्धी पाहून बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासाठी निर्मात्यांनी तिकीटाचे दर वाढवले आहेत. ही बिझनेस स्ट्रॅटेजी या आधी संजू चित्रपटाने वापरली होती. चित्रपटाचे रीव्ह्यू असे असताना चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतील की नाही हे येणाऱ्या दिवसात कळेल. आणि काशीनाथ घाणेकर सिनेमा या चित्रपटाच्या तुलनेत जास्त पसंती मिळू शकते. कारण ‘…आणि डॉ.काशिनाथ घाणेकर’ सिनेमात कलाकारांपासून ते दिग्दर्शन फारचं छान असल्याचं म्हटलं जात आहे.

समीक्षक सुमित कडेल यांनी रिव्ह्यूमध्ये चित्रपटाला फक्त १ स्टार देला आहे. ट्विट करून चित्रपटाविषयी मत व्यक्त केलं आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तान सिनेमा पाहणं म्हणजे पैसे वाया जाणं. परफेक्शनिस्ट आमिर खान चित्रपटात कमी पडल्याचं त्यांचं मत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन अधिक चांगलं करता आलं असतं. त्याचबरोबर सिनेमाची पटकथा त्रोटक आहे आणि सिनेमात अपेक्षित भव्य अॅक्शन सीनही नाहीत. त्यामुळे सिनेमा नकारात्मक रीव्ह्यू देणं त्यांनी पसंत केलं आहे.

रंगभूमीवरील जग या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एका रात्रीत स्टार झालेल्या काशिनाथ घाणेकरांचा हा प्रवास चित्रपट पाहायला आणखी उत्सुक करतो. त्याचबरोबर एखाद्या कलाकाराची छबी स्वत:मध्ये निर्माण करणारा अभिनेता सुबोध भावेनी काशिनाथ घाणेकरांना स्वत: मध्ये भिनवून घेतलं आहे.

VIDEO: दगड डोक्यात घालून दोन जणांना केली जबर मारहाण

First published: November 10, 2018, 9:01 AM IST

ताज्या बातम्या