मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'त्या' राजकीय नेत्यांवर कारवाई करा, मनसे आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी

'त्या' राजकीय नेत्यांवर कारवाई करा, मनसे आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी

गैरव्यवहार करून निकृष्ट जेवण पुरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

गैरव्यवहार करून निकृष्ट जेवण पुरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

गैरव्यवहार करून निकृष्ट जेवण पुरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबई, 3 मे : शासकीय धान्याचा काळाबाजार करून स्वतःच्या मार्केटिंग साठी वापर करणाऱ्या राजकीय नेत्यांवर व कम्युनिटी किचनच्या माध्यमातून गैरव्यवहार करून निकृष्ट जेवण पुरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक सविस्तर पत्रच लिहिलं आहे. 'राज्यावर कोरोनाचे संकट आले आहे. यातून ठाणे जिल्हाही सुटलेला नसून दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण वाढत आहेत. परंतु या संकटात गोर गरिबांना मदतीच्या नावाखाली राजकीय व आर्थिक संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न ठाणे जिल्ह्यातील काही नेतेमंडळी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी केला आहे,' असा आरोपही आमदार राजू पाटील यांनी केला आहे. मनसे आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र... "धान्य वाटपात असा घोटाळा होणार याची कल्पना होती त्यामुळे मी दि 30 मार्च 2020 रोजीच्या पत्रा ने आधीच लक्ष ठेवण्याची विनंती केली होती, परंतु शासकीय अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांच्या वर्षानुवर्षे सुरू असलेल्या साखळीतून असा घोटाळा झाला आहे. गोर गरिबांना वाटण्यासाठी उपलब्ध असलेले धान्य परस्पर हडप करून स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी स्टिकर लावून मार्केटिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे,आणि गरिबांना वाटाण्याच्या अक्षता लावलण्यात आल्या आहेत. तशाचप्रकारे ‘कम्युनिटी किचन’ च्या नावाखाली मोठया प्रमाणात धान्य उचलण्यात आले, आज किती अशी किचन ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा परिषद आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू आहेत आणि काही सुरू आहेत ते कोणत्या दर्जाचे जेवण पुरवीत आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. कालच कल्याण डोंबिवली परिसरातील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे,जनावरांनाही देण्याच्या लायकीचे नाही. खरोखरच ही गंभीर बाब आहे. आता यावर कारवाई कोण करणार आहे ? वास्तविक कम्युनिटी किचन संकल्पना चांगली होती परंतु अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांनी स्वार्थासाठी या हेतुलाच डाग लावला आहे. जर कम्युनिटी किचन व्यवस्था चांगली राबविण्यात आली असती तर आज एकाही नागरिकाची उपासमार झाली नसती आणि लॉकडाऊनही पुर्णतः यशस्वी झाला असता. कोरोनाच्या संकटाला तोंड देताना गोरगरीब जनतेच्या तोंडातील घास पळवून स्वत:चे आर्थिक व राजकीय हित पाहणाऱ्या या महाघोटाळयाची निःपक्षपाती चौकशी करण्याची गरज आहे. सर्वसामान्य जनता आज संकटात आहे, लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढविण्यात आले आहे. आता सामाजिक संस्थानीही हात आखडता घेतला आहे. त्यातच शासकीय अधिकारी आणि काही राजकीय नेते स्वतःचा फायदा पहात आहेत हे दुर्दैवी आहे. तरी आपण या प्रकरणी तातडीने लक्ष घालून ठाणे जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्था , कम्युनिटी किचन या मध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी, तसेच हे धान्य हडप करून स्वताचे मार्केटिंग करणाऱ्या राजकिय पुढाऱ्यांवरही कारवाई करावी. तसेच अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण पुरविणाऱ्यांवर व धान्य वितरणामध्ये काळा बाजार करून परस्पर राजकीय नेत्यांना उपलब्ध करून देणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, ही विनंती." संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: MNS, Uddhav thackeray

पुढील बातम्या